अदिवासी विकास निधिचे यंत्रणाकडून खर्चीक अहवाल मांगवावा. प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला
प्रतिनिधी । यावल अमीर पटेल एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी,वीज मंडळ,जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम, अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबण्या साठी मोठ्या प्रमाणात निधी वळवला जात असतो,मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही,त्याचा पाठपुरावा होत नाही किंवा त्या - त्या विभागाचे अधिकारी त्यांचा आढावा इकडे सादर करीत नाहीत,यापुढे संबंधित खात्याने निधी वापराचा आढावा आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या बैठकीत जातीने हजर राहून द्यावा,अन्यथा हा निधी देणे बंद,करा तसा ठराव आजच करा अशा सुचना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी केल्या ते यावल येथील प्रकल्प समितीच्या आयोजित बैठकीत बोलत होते. शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे गुरूवारी प्रकल्प समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत बोलतांना डॉ.चंद्रकांत बारेला यांनी प्रकल्प कार्यालयाच्या कर्मचारी वर्गांना शिस्त लावण्यापासून सुरुवात करीत,सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी आधी अजेंडा देण्याची व त्या अजेंड्यावर मिटिंग मध...