डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे ' अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी
यावल प्रतिनिधि अमीर पटेल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करा . अशी मागणी भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली आहे . अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देखिल देण्यात अला आहे . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार द्या विश्वाला तारणारे महान क्रांतदार्शि विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणातून , लेखातून वैश्विक मानवजातिला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्चा अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशीत करण्याचा विडा उचलला त्यानुसार 15 मार्च 1975 रोजी राज्यशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापना केली . असून गेल्या 44 वर्षात शासनाने फक्त २२ खंड व 03 सोअर्स केली आहे , त्यातच २००6 पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या 15 वर्षात एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही ,बाबासाहेबबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणी असून , बाबासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यास करून अनेक देशात...