उपेक्षित महीला घटकांचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे सन्मान..!*
एरंडोल नितिन ठक्कर :एरंडोल येथे तालुका पत्रकार संघातर्फे ८मार्च२०२२ रोजी जागतिक महीला दिना निमित्त समाजातील उपेक्षित व विविध क्षेञातील पुरस्कार प्राप्त महीलांचा सत्कार येथील तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवर अतीथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पुजन होऊन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कोविड काळात ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणार्या न.पा.कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. धुणी-भांडी करणारी महीला सोनाली आनंद सैंदाणे,वर्षभर शेतमजूर म्हणुन राबणारी महीला विमलबाई खंडू महाजन, सफाई कामगार म्हणुन रोजंदारीने काम करणारी महीला इंदुबाई रतन खंडारे या तळागाळातील उपेक्षित असलेल्या महीलांना साडी-चोळी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कासोदा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त परीचारीका शोभा पाटील यांचा देखिल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण महाज...