पोस्ट्स

महाराष्ट्र न्यूज़ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बातम्या दिवसभराच्या

इमेज
▪️ शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची पूर्वकल्पना असल्याचा सूत्रांचा दावा. सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची नवाब मलिक यांची माहिती.. ▪️मोठी बातमी ! 4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा अनिल देशमुखांना मोठा दणका. मुंबईतील बारमालकांनी दिलेले 4 कोटी 70 लाख रुपये अनिल देशमुख यांना मिळाले असावे. ही रक्कम त्यांनी अशा पद्धतीने वापरल्याचा ईडीला संशय ▪️राज्यातील 19997 पैकी 5947 शाळा उघडल्या. 45,07,445 पैकी 4,16,599 विद्यार्थी शाळेत हजर. ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा येथे एकही शाळा सुरु नाही. सर्वाधिक शाळा कोल्हापूरमध्ये 940 सुरू.. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. ▪️काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण; पोटच्या गोळ्यासाठी आईची वाघाशी झुंज. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी पाच वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून वाचविले. ▪️सुशीलकुमार ...