पोस्ट्स

प्रतिनिधि यावल अमीर पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यावल,रावेर तालुक्यात सिंचन विभागात अत्यंत निकृष्ट प्रतीची बांधकामे.कार्यकारी अभियंता यांचे दुर्लक्ष.

इमेज
यावल दि. ५ अमीर पटेल यावल रावेर तालुक्यात सिंचन विभागामार्फत वनक्षेत्रात,शेती शिवारात नदी नाल्यांवर बांधले जाणारे नालाबांध हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे बांधकामे होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता, आणि यावल-रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावल-रावेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत,याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी लक्ष केंद्रित करून वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकाऱ्याच्या निगरगट्ट भूमिकेचे एक उदाहरण प्रत्यक्ष समोर आले आहे.    यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेती शिवारातील सिंचन विभाग जि.प.जळगाव अंतर्गत बंधाऱ्याच्या कामाची प्रत किती खराब,निकृष्ट प्रतीचे आहे याचा एक व्हिडिओ,छायाचित्र फेसबुक,व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून व्हायरल झाल्याने यावल व रावेर तालुक्यात बांधकाम क्षेत्रात ठेकेदारी वर्गात...

यावल येथे अवैध वाळू करणारे ट्रक्टर जप्त

इमेज
शहरातील व्यास मंदीराजवळ श्यमशान भुमिच्चा मागील बाजूस ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रँक्टर पकडण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीसांत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात महसुल विभागाकडून मिळालेली माहिती अशी की २९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्चा सुमारास यावल येथील शहरालगतच्चा व्यास मंदिराच्चा जवळील हिंन्दु शमश्यान भुमिच्चा मागील बाजूस मार्गावरील स्वराज कंपनीच्चा निळ्या रंगाचे ७४४ ट्रँक्टर माँडलच्चा विना क्र. धुळ असलेल्या वाहनातून वाहतूक करतांना आढळून आले. महसुल विभागाच्चा पथकाने ट्रॅक्टर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली . याबाबत ट्रँक्टर चालक संजय भगवान भोई राहणार बोरावल गेट जवळ यावल याच्याकडे विचारणा केली असता वाळू विना परवाना आढळून आले. यावेळी महसुल विभाग फैजपुरचे मंडळ अधिकारी एम एच तडवी  समीर तडवी परसाडे तलाठी , ईश्वर कोळी यावल शहराचे तलाठी , डों कठोरा तलाठी अंजाळे तलाठी शरद सुर्यवंशी टाकरखेडा तलाठी उमेश बांभुळकर डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी यांच्चा पथकाने ही कारवाही अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ...