एरंडोल शहरात हर घर दस्तक अंतर्गत लसीकरण मोहीमेला प्रभागानुसार सुरुवात... जळगाव जिल्हा प्रतिनिधि अमीर पटेल
एरंडोल येथे शहरात प्रभागानुसार "कोरोना लस आपल्या दारी" कोविड लसीकरणाचे नियोजन आज २८ नोव्हेंबर रविवारची सकाळी ९ ते १ या वेळेत १) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर २) श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसर ३) जोहरी गल्ली परिसर तसेच संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत १) पांडव वाडा २) लक्ष्मी नगर पद्मालय नगर ३) गुरुकुल कॉलनी या भागात लसीकरणाचे काम करण्यात आले. दरम्यान सदर ठिकाणी प्रांताधिकारी विनय गोसावी, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, आनंदा चौधरी यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे सरला गढरी, रीना बोरोले, केशव ठाकूर, नगरपालिकेचे तुषार शिंपी या पथकाने कोरोना लसीकरण केले . कोविड साथरोगाच्या तिसऱ्या लाटेच्या वर्तवलेल्या शक्यतेच्या अनुषंगाने कोविड लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने तात्काळ वाढवणे आवश्यक आहे. नागरी क्षेत्रात हर घर दस्तक मोहिमेची अंमलबजावणी करणे व त्याच्या अंतर्गत लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ होण्याच्या दृष्टीने न...