किनगाव येथे अल्पविनीय मुलीने घेतला गळफास
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून यावल पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव गावातील ही चौथी घटना आहे
यासंदर्भात पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की आज दि. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास किनगाव ता. यावल येथील राहणारी त्रिशिला अडकमोल (वय १४) इयत्ता ९ वी शिकणारी किनगाव गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल यांची अल्पवयीन मुलगी हीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .
या अल्पवयीन मुलीची आई बाहेरगावी गेल्या असल्याने ती तिच्चा वडीला सोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला अडकमोल हि घरात एकटीच होती . तेव्हा काही वेळा बाहेर नाही दिसली नाही हे पाहूण शेजारींनी आवाज दिला मात्र दिने प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थानी भिंतीवरून घरात उडी घेतली होती . त्यावेळेस त्रिशिला हीने घराच्चा छतास गळफास घेवून मृत अवस्थेत आढळून आली .
यासंदर्भात यावल पोलिसांना खबर दिल्याने . अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
त्रिशिलाने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही
पुढील तपास उप निरिक्षक जितेंद्र खैरनार
यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .
यावल तालुक्यात मागील पंधरा दिवसात आत्महत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मात्र या अल्पवयीन मुलीने आत्महत्या सारखे पावूल का उचलत आहे .या प्रश्नाचे उत्तर मिळतच नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा