अकोल्याचे वकील मो. अतिक इक्बाल यांच्या युक्तिवादानंतर महिलेवर अत्याचार, ॲट्रॉसिटीॲक्ट गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जमीन मंजूर
अकोल्याचे वकील मो. अतिक इक्बाल यांच्या युक्तिवादानंतर महिलेवर अत्याचार, ॲट्रॉसिटीॲक्ट गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जमीन मंजूर
नोकरीची बतावणी करून महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बार्शिटाकळी ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शनिवारी अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात बार्शिटाकळी ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी संजय प्रांजळे ३८ यांच्याविरुद्ध 25 जानेवारी रोजी ॲट्रॉसिटीॲक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस कर्मचारी संजय प्रांजळे ३८ यांनी गुन्हाविरुद्ध अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली फिर्यादी व तिच्या पती विरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे बरेच गुन्हे दाखल असल्याचे त्यांचे वकील मोहम्मद अतीक इकबाल यांनी न्यायालयासमोर मांडले फिर्यादी महिला वारंवार खोट्या तक्रारी करून दिशाभूल करीत असल्याचे न्यायालयासमोर अकोल्याचे एडवोकेट मोहम्मद अतिक इकबाल यांनी युक्तिवाद करून सदर प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे न्यायालयाने संजय प्रांजळे ३८ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट या गुन्ह्यांमध्ये अटक पूर्व जामीन शक्यतर न्यायालयाकडून मंजूर केला जात नाही, परंतु अकोला येथील वकील मो. अतिक इक्बाल यांनी चांगला युक्तिवाद केल्याने सदर प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आले त्यामुळे आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा