बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा जळगाव जिल्ह्यात विस्तार विविध तालुक्यातील पदाधिकारी जाहीर प्रतिनिधि यावल अमीर पटेल
प्रतिनिधि यावल अमीर पटेल
जळगाव दि.१५ वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्ह्याचा मा.ना. एकनाथजी शिंदे व मा.ना गुलाबराव पाटील आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेशजी चिवटे यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय मदत कक्षाचा विस्तार आज करण्यात आला. जळगाव जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी आणि जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे यांनी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. जयश्रीताई महाजन, जळगाव महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक इब्राहीम पटेल, नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी सारा हॉस्पिटलचे डॉ. मिनाज पटेल, डॉ. रागिब जहागिरदार, सह-समन्वयक भावेश ढाके, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर व जिल्हा पदाधिकारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा