पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल तालुक्यात बालविवाह रोखला; मानापानावरुन भावानेच केली तक्रार.

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल लग्न समारंभ म्हटले की,मानपान नातेवाईकांचे रुसवे-फुगवे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतोच. अनेकदा अशा काही कारणावरुन वादही उद्भवतात. मात्र,यावल तालुक्यातील साकळी येथे लग्नात मावस भावाला मान मिळाला नाही.या रागातून संबंधित व्यक्तीने बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ अर्ज पाठविल्याने बालविवाह रोखण्यात आला आल्याची घटना यावल तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज23 मे रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (वय 27) याचा विवाह होत असताना. मात्र नवरीचा मावसभाऊ रविंद्र शालिक सोनवणे यांनी यावल येथे महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या बालविवाह संदर्भात अर्ज दिला. या अर्जाची तात्काळ दखल घेत कत्पना तायडे व मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदीर हॉल येथे लग्नस्थळी जावुन हा होणारा बालविवाह थांबविला. महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोले, पर्यवेक्षिका कल्पना तायडे व साकळी अंगवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदती...

यावल शहरात भ्रष्टाचाराचे आणि निष्क्रियतेचे"खड्डे"लोकप्रतिनिधी, विविध संघटना गप्प.

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल  यावल शहरात विकसित भागात पाणीपुरवठा योजनेचा "फियास्को" झाल्यामुळे पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवल्याने तसेच खोदलेले खड्डे तात्काळ बुजविले जात नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफ-सफाई करण्यासह,ओला व सुका कचरा वाहतूक व त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ सुरू आहे याकडे यावल शहरातील काही आजी-माजी नगरसेवकांसह अध्यक्ष तसेच विविध संघटना गप्प असल्याने आणि यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.          याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात आली.ही कोट्यावधीची कामे करताना संबंधित यंत्रणेने सोयीनुसार ठेकेदाराच्या नावाखाली टक्केवारी हडप केल्याने ठेकेदाराने त्याच्या सोयीनुसार आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे विकसित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होण्या...

यावल येथे तरुणाला गंभीर जख्मी करणारे तिघे पोलिसांचा ताब्यातयावल प्रतिनिधि अमीर पटेल

इमेज
 प्रतिनिधि अमीर पटेल यावल शहरातील प्रेम प्रकरणातील झालेल्या प्राणघातक  हल्ल्यातील तिघ आरोपिंना पोलिसांनी अटक केल आहे . यावल पोलिसांत दिलेल्या फर्यादिनुसार जावेद युनूस पटेल (वय २३ रा. काजीपूरा यावल) हा मजूरी करून आपला व उदरनिर्वाह करतो त्यास फैजपुर येथील आरोपी शेख मुजम्मिल उर्फ मुज्जू शेख हकीम  (वय२६) हिदायत अली शेख उर्फ राजू शेखावत(वय २०) शेख शोएब शेख इकबाल खाटिक (वय२९) तिघे राहणार ताहानगर फैजपूर यांनी शुक्रवारी दि.६ मे रोजी रात्री २ ते ३ वाजेच्चा सुमारास यावल भुसावळ रस्त्यावरती असलेले घोडेपिर दर्गा जवळील बांधलेल्या खोलिच्चा मागे प्रेम प्रकरणातून चाकूने प्राणघात हल्ला करून जख्मी केले होते. जख्मी जावेद पटेल याला जळगाव  सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. यापासून तिघे आरोपी फरार होते . त्यांना फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्चा मार्गदर्शनाखाली यावलचे  पोलिस अधिक्षक ' आशित कांबळे पोलीस उपनिरक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह पोलिस पथकासह शुक्रवार ६ मे रोजी रात्री १०.४० वाजेच्चा सुमारास अटक केली.  

यावल येथे एका तरुणावर प्राणघात हल्ला

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल येथील पटेल वाडा भागातील रहिवासी जावेद युनूस पटेल (वय २३ ) शहरातील काझीपूरा भागतील एका महिले सोबत त्यांचे प्रेमसंबंध होते या संबंधातून त्यांचे वाद झाले . आणि सदर महिलेने मध्यरात्री दोन वाजेच्चा सुमारास जावेद पटेल यांना कॉल करून घराबाहेर बोलावले तेव्हाच घराबाहेरील फैजपूर चे गुड्डू डॉन आणि सोनू नामक या तिघांनी त्याला दुचाकीवर बसवून भूसावळ रस्त्यावरती असलेले घोडेपिर दर्गावर घेवून गेले तेथे त्याचा वाद झाला आणि तिघांनी त्याला धारदार चाकूने जिवे ठार मारण्याचा पर्यत केला . तरी महामार्गावर रहधारिचा वाहनांना पाहून तिघांनी पळ काढला . तर जख्मी अवस्थेत असेला तरुण जावेद पटेल यांने नातेवाईकांना माहिती व त्याला तातडीने यावल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले तेव्हाच प्रथोपचार करून तातडीने जळगाव जिल्ह्याचे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय उपचार करीता दाखल करण्यात आले . या हल्ल्याच्या कळतात शहरात एकच खळबळ उडाली आहे . असून गंभीर पणे जख्मी जावेद पटेल याचा जाब जवाब घेण्यासाठी यावल पोलीस स्थानकाचे परिविक्षाधीन आय . पि .एस . अधिकारी आशित कांबळे व पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोपळकर ...