डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे ' अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी

यावल प्रतिनिधि अमीर पटेल 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करा . अशी मागणी भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली आहे . अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देखिल देण्यात अला आहे .
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार द्या विश्वाला तारणारे महान  क्रांतदार्शि विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणातून , लेखातून वैश्विक मानवजातिला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्चा अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशीत करण्याचा विडा उचलला त्यानुसार 15 मार्च 1975 रोजी राज्यशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन  समिती स्थापना केली . असून गेल्या 44 वर्षात शासनाने फक्त २२ खंड व 03 सोअर्स केली आहे ,
त्यातच २००6 पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या 15 वर्षात एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही ,बाबासाहेबबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणी असून , बाबासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यास करून अनेक देशातील सरकारे आपल्या प्रजेच्चा प्रशनांची उत्तरे शोधून कार्यकरत आहे तर बाबासाहेब लिखित  "प्रोब्लेम  ऑफ रूपी " ह्या प ग्रंथाच्चा आधारावरच आपल्या देशाची सर्वोच्च बँक असणारी " रिझर्व बँक" स्थापित झालेली आहे .
बाबासाहेबांचे विचार विश्वाला मार्गदर्शन करत असतांना त्यांचे अप्रकाशित साहित्य मात्र सरकारी गोदामात धूळ खात पडले आहे .
तरी सरकारची ही लक्षमय घोडचुक आम्ही कदापी सहन करणार नसल्याचे भिम आर्मिचे राज्यप्रवक्ते मा. रमाकांतजी तायडे यांनी सांगीतले असून वेळप्रसंगी आम्ही , 
भाई चंद्रशेखर आझाद यांच्चा क्रांतीप्रेरणातून उग्र आंदोलन छेडू , असा सज्जड दम सुद्धा मा. रमाकांतजी तायडे यांनी दिला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?