बातम्या दिवसभराच्या
▪️शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची पूर्वकल्पना असल्याचा सूत्रांचा दावा. सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची नवाब मलिक यांची माहिती..
▪️मोठी बातमी ! 4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा अनिल देशमुखांना मोठा दणका. मुंबईतील बारमालकांनी दिलेले 4 कोटी 70 लाख रुपये अनिल देशमुख यांना मिळाले असावे. ही रक्कम त्यांनी अशा पद्धतीने वापरल्याचा ईडीला संशय
▪️राज्यातील 19997 पैकी 5947 शाळा उघडल्या. 45,07,445 पैकी 4,16,599 विद्यार्थी शाळेत हजर. ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा येथे एकही शाळा सुरु नाही. सर्वाधिक शाळा कोल्हापूरमध्ये 940 सुरू.. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.
▪️काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण; पोटच्या गोळ्यासाठी आईची वाघाशी झुंज. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी पाच वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून वाचविले.
▪️सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार.. भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांचं जाहीर कौतुक..
▪️लसीच्या नावाखाली केवळ 'सलाईन वॉटर' टोचलं!, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती.. 'घरोघरी लसीकरणासंदर्भात सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही', अद्याप मार्गदर्शक तत्वं जारी न केल्याबद्दल हायकोर्टाचे ताशेरे..
▪️आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (ता.18) पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी.. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची नामदेव पायरीला गर्दी..
▪️धक्कादायक: ऑलिम्पिक ट्रेनिंग कॅम्पमधून युगांडाचा वेटलिफ्टर ट्रेनिंग कॅम्पमधून पळाला. नियमित कोरोना चाचणी देण्यात अपयशी ठरल्यानंतर तो बेपत्ता झाला. घरी परत जाण्यापेक्षा जपानमध्येच राहण्याची चिठ्ठीत इच्छा.
▪️RTE मधून शाळेत प्रवेश हवाय? 50 हजार द्या; पुण्यात शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. शालेय प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
▪️मनसेला धक्का देत मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया.
▪️सध्याच्या वेगानं पूर्ण मुंबईचं लसीकरण व्हायला 3-4 वर्ष लागतील, मुंबईतील अपु-या लस पुरवठ्यासंदर्भात एका शिक्षकाची हायकोर्टात याचिका.. आतापर्यंत केवळ 14 लाख, म्हणजेच केवळ 6 टक्के मुंबईकरांचे लसीकरण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
PATEL 82 NEWS
MAHARASHTRA
https://youtu.be/Ej7wDV_D_0U*
RAJESHTHAN
*https://youtu.be/Zmy4rQ4zOGQ*
UTAR PRADESH
*https://youtu.be/DBR8Um9VG4Q*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*जाहिरातीसाठी संपर्क - 8180982735*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा