अकोला जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन 9 में ते 15 में पर्यंत

 


                      https://www.youtube.com/channel/UC-W6kxbmEia2MyudOod437A

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यात दि.९ ते १५ दरम्यान कडक लॉकडाऊन

अकोला, दि.७- जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला  आटोक्यात आणण्यासाठी व फैलाव रोखण्यासाठीचा उपाय म्हणून आपतकालिन उपाययोजना करणे गरजेचे असल्‍यामुळे जिल्‍हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी अकोला जिल्ह्याकरिता रविवार दि.९ चे  रात्री १२ वाजेपासून  ते शनिवार दि. १५ च्या रात्री १२  वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.  हे आदेश रविवार दि.९  रोजीचे रात्री १२ वाजेपासुन ते शनिवार दि.१५  चे रात्री १२ वाजे पर्यंत अंमलात राहतील.

आदेशातील महत्त्वाच्या बाबी या प्रमाणे-

१. कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक व  वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पुर्णत: बंदी राहील.

२.सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी इत्‍यादी दुकाने तसेच खादयपदार्थांची इतर सर्व दुकाने (कोंबडी मटन पोल्‍ट्री मासे व अंडी यासह)  सर्व मद्यगृहे , मद्यदुकाने व बार  ही दुकाने पुर्ण पणे बंद राहतील. तथापी, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी ११  या कालावधीत चालु करण्‍यास परवानगी राहील. कोणत्‍याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्‍वत: जावुन खरेदी करता येणार नाही.

३.         हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी याची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यत सुरु राहील. कोणत्‍याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्‍टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी येथे स्‍वत: जावुन पार्सल घेता येणार नाही. या ठिकाणी ग्राहक आढळुन आल्‍यास संबंधीत आस्‍थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.  या बाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्‍हा पुरवठा अधिकारी, महानगर पालिका, अन्न व औषधे प्रशासन  यांची राहील.

४.        या कालावधित जिल्‍ह्यातील सर्व कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍या, आठवडी बाजार, भाजी मार्केट  बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, महानगर पालिका आयुक्‍त, मुख्‍याधिकारी न.प. व तहसिलदार  यांची राहील.

५.         पाळीव प्राण्‍यांच्‍या खाद्य पदार्थाची दुकाने, पावसाळ्याच्‍या हंगामात व्‍यक्‍तीसाठी तसेच संस्‍थासाठी संबधित          असणाऱ्या साहित्‍याच्‍या उत्‍पादनाच्‍या निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि या दुकानांची फक्‍त घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी ११ या कालावधीत चालु ठेवणेस परवानगी राहील. जिल्‍हा         पशुसंवर्धन अधिकारी, जिल्‍हा परिषद अकोला यांची संनियंत्रणाची जबाबदारी राहील.

६.         कृषी अवजारे, कृषी सेवा केन्‍द्र  व शेतातील उत्‍पादनाशी संबधित दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि शेतकऱ्यांना आवश्‍यक             त्‍या वस्‍तुचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्‍याची जबाबदारी ग्रामपंचायतस्‍तरावर संबधित कृषी             सेवक, तालुका स्‍तरावर तालुकाकृषी अधिकारी यांची राहील.जिल्‍ह्यात या प्रक्रियेचे नियोजन व नियंत्रण करण्‍याची जबाबदारी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी , अकोला यांची राहील.

७.        सार्व‍जनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगिचे पुर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Mornig Walk व Evening Walk  करण्‍यास बंदी राहील. या बाबत महानगर पालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबंधीतांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करावी.

८.         सर्व केशकर्तनालय, सलुन, स्‍पा, ब्‍युटीपार्लर संपुर्णता बंद राहतील.

९.         शाळा महावद्यिालय, शैक्षणिक संस्‍था, प्रशिक्षण संस्‍था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतःबंद राहतील.           तथापि, ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्‍याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) जिल्‍हा परिषद अकोला यांची राहील.

१०.       सर्व प्रकारचे स्‍वागत समारंभ, मंगल कार्यालय हॉल हे पुर्णतः बंद राहतील. लग्‍न समारंभ करावयाचा असल्‍यास तो साध्‍या पद्धतीने घरगुती स्‍वरुपात करण्‍यात यावा.  लग्‍नामध्‍ये  मिरवणूक, बॅन्‍ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही.  लग्‍न समारंभाकरिता केवळ २५ व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍याची परवानगी असेल.  लग्‍न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्‍त चालणार नाही याची दक्षता घ्‍यावी.  विवाह सोहळा बेकायदेशिररित्‍या पार पडणार नाही याची संबंधीत ग्रामस्‍तरीय कोरोना नियंत्रण समिती यांनी दक्षता घ्‍यावी  व नियमानुसार त्‍यांचेवर कायदेशिर कारवाई केली जाईल. लग्‍न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण करण्‍याची जबाबदारी संबंधीत तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था , पोलीस ठाण्‍याचे  प्रभारी अधिकारी यांची राहील.

 ११.      सर्व चित्रपट गृहे, व्‍यायम शाळा, जलतरण तलाव, करमणूक कर व्‍यवसाय नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षा गृह,         सभागृह संपुर्णतः बंद राहील.

१२.       सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्‍सा सेवा, त्‍यांचे नियमीत वेळेनुसार सुरू राहतील.

१३.       मेडीकल स्‍टोअर्स व दवाखाने तसचे ऑनलाईन औषध सेवा २४ तास कालावधीत सुरू राहतील.

१४.      चष्‍माचे दुकाने बंद राहतील परंतू आपत कालीन परिस्थितीत रूग्‍णास डोळ्यांच्‍या डॉक्‍टरांनी त्‍यांचे             दवाखान्‍यास/हॉस्पिटल यास जोडण्‍यात आलेल्‍या चष्‍मा दुकानातुन चष्‍मा उपलब्ध  करून देण्‍याची जबाबदारी     राहील.

१५.       पेट्रोल पंप-  सर्व पेट्रोलपंपावर या आदेशान्‍वये  नमूद करण्‍यात आलेल्‍या परवानगी दिलेल्‍या बाबीकरिताच पेट्रोल वितरीत करण्‍यात यावे.  मालवाहतूक, रुग्‍णवाहिका, शासकीय वाहणे,  अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचारी,  परवानगी पास असलेली वाहने,  प्रसार माध्‍यमाचे  प्रतिनिधी  यांचे करिता पेट्रोल डिझेल, व एलपीजी गॅस याची उपलब्‍धता करुन देण्‍याबाबतची जबाबदारी    कंपनीची अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस  यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , पोलीस विभाग  यांनी दैनंदिन अहवाल जिल्‍हा प्रशासनास सादर करावा.  

१६.       गॅस एजन्‍सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी सात ते ११  या वेळेत करण्‍यात यावे. पर‍ंतू           ग्राहकांना गॅस एजन्‍सीमध्‍ये प्रत्‍यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्‍यास अथवा सिलेंडर घेण्‍यास प्रतिबंध राहील. गॅस   एजन्‍सी येथे ग्राहक आढळुन आल्‍यास संबधित एजन्‍सी कार्यवाहीस पात्र राहील.पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्‍हा     पुरवठा अधिकारी,  यांची राहील. 

१७.      सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व आस्‍थापना या कालावधीत बंद राहतील. वित्‍त व्‍यवसायाशी  निगडीत सर्व कार्यालय यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरू ठेवायचे असल्‍यास ते केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवता येईल. आणि सर्व विभाग प्रमुखांनी त्‍यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवावी.  केवळ अत्‍यावश्‍यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना यांचेशी संबधित शासकीय, निमशासकीय             कार्यालय सुरू राहतील.उदा. महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्राम पंचायत, आरोग्‍य सेवा, महानगर पालिका, नगर पालिका व नगर पंचायत ईत्‍यादी.

१८.       सर्व बँका, पतसंस्‍था, पोस्‍ट ऑफीसेस ही कार्यालय नागरीकांसाठी  बंद राहतील.  परंतू कार्यालयीन वेळेत प्रशासकीय कामकाज सुरु राहील. तसेच  ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्‍यात याव्‍यात.   कार्यालयामध्ये येण्या जाण्याकरिता कार्यालयाचे  ओळखपत्र अनिवार्य राहील.  या करिता स्वतंत्र परवानगी प्रशासनाकडून देण्यात येणार नाही.

१९.       सर्व आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रे नागरीकांकरीता बंद ठेवण्‍यात येत आहेत. तथापि नागरीकांना ऑनलाईन स्‍वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधा करीता अर्ज सादर करता येतील.

२०.       उक्‍त कालावधीत नागरीकांसाठी दस्‍त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील.

२१.       MIDC, उद्योग, कारकाखाने, सुतगिरणी येथे केवळ In-situ पद्धतीने कामकाज सुरू राहील. व्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र यांचेवर नियंत्रणाची जबाबदारी राहील. 

२२.       शासकीय यंत्रणामार्फत मान्‍सुन पुर्व विकास कामे आवश्‍यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक काम चालु राहतील. संबधित शासकीय यंत्राणांना या करीता वेगळ्या परवानगीची आवश्‍यकता नाही.या करिता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी  संपर्क साधू नये.

२३.       सर्व शासकीय कार्यालये अभ्‍यागतासाठी पुर्णत: बंद ठेवण्‍यात येत आहेत. निवेदने/ अर्ज  केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येईल.

२४.      दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्‍यवस्‍था यांना सकाळी सात  ते ११ व सांय सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत परवानगी राहील.

२५.      ई-कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरू राहतील.तसेच स्‍थानिक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा             पुरवणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्‍या घरी जातांना बिल व संबधित दुकानदारा मार्फत देण्‍यात येणारे    ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.संबधित कर्मचाऱ्यांना निगेटीव्‍ह RTPCR चाचणी अहवाल सोबत     बाळगणे बंधनकारक राहील. या अहवालाची वैधता ७ दिवसाकरीता असेल.

२६.       सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने, यांची वाहतुक नागरीकांना अत्‍यावश्‍यक कामाकरिता फक्‍त अनुज्ञेय राहील.  अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.तसेच रूग्‍णाकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील.

२७.      जिल्‍ह्याच्‍या सर्व सिमा या आदेशाव्‍दारे सिल करण्‍यात येत असुन माल वाहतुक व रूग्‍ण वाहतुक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास केवळ अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्‍यात येईल. या करीता वेगळ्या स्‍वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांचेकडून रितसर परवानगी प्राप्त करुन घ्यावी.

२८.      जिल्ह्याच्‍या मालवाहतूक व रुग्‍णवाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्‍वतंत्र परवानगीची गरज असणार नाही.  तथापि माल वाहतूक शाखा, खतसाठा इत्‍यादी बाबतीत फक्‍त लोडींग व अनलोडींग करण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील.  इतर कारणांकरिता व आवश्‍यक वैद्यकीय कारणांकरिता जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची  असल्‍यास, https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन  ई-पास काढून वाहतूक करता येईल.

२९.       पावसाळयापूर्वी  राष्‍ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण होण्‍याचे दृष्‍टीने  केवळ In-situ पद्धतीने सुरू राहील.

३०.      प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनल सुरु राहतील.

३१.       या निर्देशांची काटेकारपणे अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला , महसूल विभाग तसेच  ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालिका/नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्‍याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.

३०.       वरील प्रमाणे आदेश सर्व आस्‍थापनांना काटेकारपणे लागु होतील तसेच कोणत्‍याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस  कामकाज सुरू ठेवण्‍याकरीता विशेष परवानगी दि.१५मे २०२१ पर्यंत देण्‍यात येणार नाही.  सर्व आस्‍थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्‍याकरिता त्रिसुत्री पद्धतीची अंमलबजावणी कराव

                             हे आदेश दिनांक ९मे च्या रात्री १२ ते दिनांक १५ मे २०२१ चे  रात्री १२ वा. पर्यंत लागु राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?