पोलीस मदत केंद्र घोट येथे भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची दुसरी भेट

पोलीस मदत केंद्र घोट येथे भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची दुसरी भेट . . .
 -------------------------
जमिनीच्या वादातून हत्या केल्याची शक्यता वाढली . . .
-------------------------------- मृत्यूच्या एक दिवस अगोदर जीवे मारण्याची फोनवरून धमकी ...
 ------------------------------------
 भारतीय अॉल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंंडिया चे संस्थापक/अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छीजी यांचे आदेशानुसार . . .
      भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे चंद्रपूर/ गडचिरोली जिल्हा निरीक्षक स्व.भगवानजी पुराम यांची दिनांक २९ जुलै रोजी घोट परिसरातील तुंबडी तालुका चामोर्शी येथे अपघाताने दुःखद निधन झाल्याचे देखावा करून त्यांची हत्या केल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. या घातपाता मागे घोट शांती नगर येथील अनिता मंडल व तिचा मुलगाअसल्याचे निष्पन्न होत आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचे सबळ पुरावे भगवान पुराम यांचा मुलगा कृष्णा भगवान पुराम व मुलगी कुमारी खुशी भगवान पुराम यांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी भारतीयऑल मिडिया सुरक्षा  फोरम अॉफ इंडियाच्या केंद्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस मदत केंद्र घोट चे उप निरीक्षक श्री.श्रीमंगल साहेब यांच्यासमोर बयान दिले. भगवान पुराम यांना एक दिवस अगोदर मंडल याने धमकी दिल्याचे फोन टॅपिंग श्रीमंगल साहेब यांना ऐकविले.तसेच घातपाताच्या दुसऱ्या दिवशीअनिता मंडल हिने जमिनीचा ताबा देण्यासाठी कृष्णा पुराम याला फोन केल्याचे पुरावे सादर केले. क्रृष्णा पुराम व बहिण स्वाती पुराम यांच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे,आता वडिलांचा आधार हरपल्याने दोघे भाऊ बहीण निराधार झाले आहे.
   कृष्णा पुराम यालाही जमिनीचा ताबा सोडण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या येत असुन दोघे भाऊ बहीण भयानक दहशतीत असल्याचे कळताच भारतीयऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असून या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करीत राहील व दोघा बहीण-भावांचे रक्षण करीत राहणार असल्याचे सांगितल्यावर भाऊ बहीण आता सामान्य स्थितित राहत आहेत.
  या प्रकरणात श्रीमंगल साहेब यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.क्रृष्णा पुराम याने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्याचेही आश्वासन दिले.   परंतु- घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करणारे व घटनेचा तपास  करणारे पोलीस हवालदार श्री.संतदासमसराम यांनी दि. ४ तारखेला कृष्णा पुराम याला पोलीस मदत केंद्र घोट येथे बोलावणे व स्वत: उपस्थित नसणे, भगवान पुराम यांच्या खिशातले पाकीट/पैसे/ एटीएम गहाळ असणे,त्यांचे फोरमचे ओळखपत्र /चष्मा घटनास्थळावरून गहाळ असणे, घातपाताच्या एक दिवस अगोदर जीवे मारण्याची धमकी येणे.
     विशेष म्हणजे स्व.भगवानजी पुराम यांचा अपघात एका छोट्याच्या पळसाच्या झाडाला धडक देऊन झाला असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु त्यांच्या शरीरावर इजा झाल्याचे एकही निशाण नसणे.मात्र त्यांच्या गळ्यावर वायरने किंवा ताराने आवळून खून करण्याचे गळ्यावर निशान असणे.
  यावरून हे सिद्ध होते की, स्व.भगवान पुराम यांचा अपघात नसून हा खूनच आहे. 
 भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया पोलीस मदत केंद्र घोट व जिल्हा प्रशासनाला आवाहन करते कि, वरील संपूर्ण संशयास्पद परीस्थितिंचा गांभीर्याने अभ्यास करुन
 तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना तात्काळ अटक करावी. वेगाने चौकशी करावी.
   अन्यथा भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल व संशयित आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करेल.
  अशि भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची मागणी आहे.ही मागणी करण्यासाठी दिनांक 4 ऑगस्टला भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या केंद्रीय महिला अध्यक्षा राजवींदर कौर शेरगिल मॅडम,केंद्रीय महासचिव नागेंद्र चटपल्लीवार, केंद्रीय महिला उपाध्यक्षा प्रगती भोसले मॅडम,जिल्हा महासचिव सुनील रामटेके, हर्षा वानोडे मॅडम,जया पसलावार मॅडम, वनिता घागरे मॅडम ,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष गजानन पुराम, विशाल मलावी जिला सदस्य,चांदेकर मॅडम जिल्हा सदस्या,ज्योती गोलीवार मॅडम जिल्हा सदस्या ई. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?