यवतमाळमधील कळंबच्या श्री चिंतामणी मंदिर परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.

पटेल 82 न्यूज़ 

मुख्य संपादक:- अनसार पटेल 8180982735

यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब हे विदर्भातील अष्टविनायक आहे. याच श्री चिंतामणी मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून भक्तांची गर्दी श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी झाली आहे. विषयावर भूगर्भ शास्त्रज्ञ सौरभ मोटघरे यवतमाळ शास्त्रज्ञ यांनी आज कळंब चिंतामणी परिसरात पथकासह दाखल झाले.  या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा वाढला म्हणून या भागात पाणी आले आहे, अशी  प्राथमिक माहिती शास्स्त्रज्ञ सौरभ मोटघरे यांनी दिली.

नेमकं काय घडलं?
कळंबमध्ये श्री चिंतामणी प्राचीन मंदिर आहे. खुद्द भगवान इंद्रानेच या चिंतामणीची स्थापना केली असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे येथे नेहमी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. याच ठिकाणी काल सायंकाळी गंगा अवतरली असल्याची चर्चा सुरु झाली. 1995 नंतर 26 वर्षांनंतर मंदिरात गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्याने अनेक भागातून भक्त इथं येत आहेत.  चक्रावती नदीकाठी असलेले पवित्र श्रद्धास्थान कळंबचे ग्रामदैवत आहे. विशेष म्हणजे येथील चिंतामणी  विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून येथील चिंतामणी भक्तांच्या चिंता दूर करतो अशी अख्यायिका आहे. 

यवतमाळ -नागपूर महामार्गावर कळंब हे तालुक्याचे ठिकाण आहे. यवतमाळपासून पूर्वेला साधारण 22 किलोमीटर  अंतरावर चिंतामणी गणेशाचे हे मंदिर आहे.चिंतामणीचे  मंदिर जमिनीखाली 33 फूट खोल असून मंदिराची बांधणी साधी आणि सुबक आहे. मंदिरातील सभा मंडपात प्रवेश करताच येथे चार मुखाची श्री गणेशची मूर्ती दिसते. एकाच दगडात चारही बाजूंना चार गणेश मुर्ती कोरल्या आहेत. दक्षिणमुखी या मंदिरात पोहचण्यासाठी तीन मार्ग आहेत. येथील मंदिराच्या 29 पायऱ्या खाली उतरुन गेल्यानंतर एक अष्टकोनी कुंड आहे आणि त्याच समोर भगवान श्री चिंतामणीची पवित्र आणि प्राचीन मूर्ती आहे.


येथील अष्टकोनी कुंडाला जिवंत झरे असून त्याला पावन तीर्थ  समजले जाते आणि त्याच्या अगदी समोरच्या गाभाऱ्यात मुख्य चिंतामणीची मूर्ती आहे. जमिनीवर खाली गणेश मंदिरात येण्यासाठी पायऱ्यांचे 3 मार्ग आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाच्या भिंती आहेत . मंदिर जमीनीखाली असून सुद्धा ते हवेशीर आहे. येथे प्रवेश करताच भक्तांना प्रसन्न वाटते. येथे असलेल्या अष्टकोनी कुंडाच्या परिसरात काल सायंकाळी या भागांतून गंगा अवतरली असा दावा मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष चंदू चांदोरे यांनी केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?