दुधानी डोहात बुड़ुन युवकाचा करुण अंत

न्यूज़ चैनल साठी लिंकपातूर (जि. अकोला) : तालुक्यातील पातूर शहरापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या धोदानी धबधबदा येथील डोहात एका युवकाचा बुडून करून अंत झाल्याची घटना घडली आहे. प्रज्वल ऊर्फ चिकू यशवंत तेलगोटे (वय २४, रा.कमलानगर, बायपास अकोला) असे मृताचे नाव आहे.

पातूर तालुक्यातील अकोला-वाशीम रोडपासून गोंधळवाडी फाट्यापासून अंदाजे 6 किमी अंतरावर असलेल्या धोदानी धबधबा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रविवारी अकोला येथील तेलगोटे परिवार देखील इतर पर्यटकांप्रमाणे धोदानी धबधबा येथे आले. त्यांनी इथे आल्यावर हौशीने फोटो काढले. निसर्गाचा आनंद घेतला व जेवण करून घरी परत निघाले होते. पण, काळाला काही औरच मंजूर होते.

तेलगोटे परिवारातील एक युवक परिवारासोबत घरी परतत असताना मामाला गरमी होत असल्यामुळे तोंडावर पाणी मारतो असे सांगून धबधब्याच्या काठावर तोंड धुण्यासाठी गेला. यावेळी तोल जाऊन डोहात पडला व खाली असलेल्या खडकावर आढळल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर युवक डोहात पडल्यावर सुमारे २० मिनिटं होऊन सुद्धा वर आला नसल्याने स्थानिक युवकांनी शोध घेणे सुरू केले असता तब्बल चार तासांनंतर सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले.

तब्बल चार तासांच्या शोधानंतर प्रज्वलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पातूर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?