यावल शहरातील विस्तारित भागातील कामाची चौकशी करीता प प प्रांतांचे नगर पालिकेस पत्र


यावल : अमीर पटेल
 
यावल :नगरपरिषद हद्दीत नविन वस्तीमध्ये होत असलेल्या रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे आणि पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार प्रांतांकडे करण्यात आली होती तेव्हा या तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे.
येथील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर प्रांताधिकारी ककैलास कडलग यांच्या कडे २४ जानेवारी रोजी तक्रार केली होती यात त्यांनी म्हटले होते की नगर पालिका हद्दीतील पाईप लाईन व रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तेव्हा नविन वस्तीमध्ये केलेल्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाच्या कामाबाबत आणि पाईप लाईन च्या कामा गुणवत्ता तपासणी करावी व त्याचा अहवाल घेतल्या शिवाय अंतिम बील प्रदान करुन नये, किव्वा ठेकेदारास बील अदा करतांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी असे त्यांनी म्हटले होते तेव्हा नुकतेच फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देत या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत तेव्हा म्हटले आता मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?