बुलेट ट्रेन सुस्साट! नागपूरहून पाच तासांत गाठता येणार मुंबई

ही असणार चौदा स्थानके हायस्पीड बुलेट ट्रेनचा विस्तृत प्रकल्प

वीडियो न्यूज़ साठी लिंक वर क्लिक करा


पाच तासांत नागपूरहून मुंबई गाठता येईल, असे म्हटल्यास कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, तंत्रज्ञानाने दोन शहरांतील अंतर कमी केले असून यासंदर्भातील नागपूर-मुंबई या ७३६ किमीच्या हायस्पीड बुलेट ट्रेनचा विस्तृत प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने 'लिडार' तंत्रज्ञानाचा वापर करून लाइट डिटेक्शन अॅण्ड रेजिंग सर्व्हे ऑक्टोबर २०२१मध्ये विमानाद्वारे भूसर्वेक्षण केले. त्यात जमिनीचा तपशील आणि इतर माहितीचा समावेश आहे. त्याचा विस्तृत आराखडा तयार झाला असून रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. समृद्धी महामार्गाला समांतर हाय स्पीड रेल कॉरिडॉर चालविण्याची ही योजना आहे. समृद्धी एक्प्रेस मार्गालगत बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर अंतिम निर्णय घेण्यात आला असून लवकरच रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळेल. हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरमुळे नागपूर-मुंबई प्रवास चार ते पाच तासांत पूर्ण होईल. सध्याच्या घडीला रस्ता किंवा रेल्वेने बारा ते पंधरा तास लागतात. मुख्यत: समृद्धी महामार्गाला समांतर बुलेट ट्रेन राहणार असल्याने कमीतकमी जागेत हा प्रकल्प पूर्ण करता येणार आहे.
चौदा स्थानकांवर मिनिटभराचा थांबा

प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन दहा जिल्ह्यांतून जाणार आहे. २५० किमी वेगाने धावणारी ही ट्रेन चौदा स्थानकांवर केवळ एक मिनिटासाठी थांबेल. अजनी रेल्वेस्थानकावरून सुटणारी बुलेट ट्रेन खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या स्थानकांवर थांबेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?