यावल फैजपुर रस्त्यावर दोन दुचाकीची धडक : दोन गंभीर

दि. ३ अमीर पटेल

 यावल : यावल - फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असुन दोघांवर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे 
यावल - फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळ पेट्रोल पंप आहे या पंपा जवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेला दुचाकी क्रमांक एम. एच. 15 बी. बी. 88 33 द्वारे छोटू एकलोसिंग बारेला वय 32  रा. रावेर हा यावल कडून फैजपूर कडे जात होता तर दुचाकी क्रमांक एम. एच. 39 एक्स. 0576 द्वारे अब्दुल हफिस अब्दुल हमीद वय 45 रा.मन्यार गली चोपडा हे फैजपूर कडून यावल कडे येत होते दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या दोघे गंभीर जखमी झाले.


 घटनास्थळावरून मार्गस्थ होणार साकळी येथील मेश इंडस्ट्रीचे मालक युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, अधिपरीचारिका दिपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर,मुराद तडवी,निरज झोपे,बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारूक तडवी,प्रविण बारी आदींनी प्रथमोपचार केले यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बऱ्हाटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी भेट दिली दोघं वाहने त्यांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?