बसस्थानक परिसरात 'नो पार्किंग झोन' चे उल्लंघन

मूर्तिजापुर  आसिफ खान

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना 1947 साली झाली असून मोटर वाहन कायदा 1950 नुसार टप्पा प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी राज्य परिवहन महामंडळाकडे सोपवलेली आहे.

 असे असले तरीही खाजगी वाहतूकदार विविध परवानाद्वारे बसेस जीप व अन्य छोट्या-छोट्या वाहनांचा वापर करून सर्रासपणे अवैधरीत्या टप्पा प्रवासी वाहतूक करीत आहेत. तसेच या व्यतिरिक्त तीन आसणी सहा आसनी रिक्षा चालक हे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवासी वाहतूक करीत आहेत.

 त्याचप्रमाणे सदर खाजगी वाहतूकदार व अवैध प्रवासी वाहतूकदार 200 मीटर नो पार्किंग झोन चे उल्लंघन करून राज्य परिवहन बस स्थानकाच्या आतबाजूला आपली वाहने उभी करून राज्य परिवहन बस स्थानकातील प्रवाशांना आकृष्ट करीत असतात.

 परिणामी राज्य परिवहन प्रवासी संख्येमध्ये घट होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न व भारमानावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

 वरील सर्व बाबी विचारात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने अवैध व खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांना आळा घालण्यासाठी संबधीत प्रशासनामार्फत विशेष लक्ष द्यावे. अशा सूचनांचे पत्र देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?