मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू

 मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू 


                  (Asif khan) 

मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू 

अकोला :- महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या निवासस्थानातील झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. 


    स्थानिक रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मराठा नगर येथे अकोला महापालिका आयुक्त यांचे निवास स्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना मधील एका झाडावरून मधमाशांचे पोळ काढताना एका 55 वर्षीय इसमाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. 
याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असला तरी दोषी व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मनपातील काही अधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. तर
मृतकाच्या नातेवाईकांवर सुद्धा दबावतंत्राचा वापर केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी बंद केले आहेत. तर याप्रकरणी रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्याशी संपर्क केला असता याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पुढील चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?