अत्यावश्यक सेवांसाठी निर्बंधात सवलत - कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश. https://youtube.com/channel/UC-W6kxbmEia2MyudOod437A
https://youtu.be/ai-RPTrM0h4 अकोला , दि. 1 5 ( जिमाका)- जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार दि. 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंधाना मुदतवाढीचे आदेश निर्गमित केले आहे. तथापि , अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना निर्बंधासह मुभा देण्याचे आदेश जारी केले आहे. हे आदेश शनिवार दि. 15 रोजीचे रा त्री 12 वाजेपासुन ते मंगळवार दि. 1 जून चे सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. निर्बंधासह मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे- अ.क्र. बाब निश्चित करण्यात आलेली वेळ 1 सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 .00 ते दु. 11 .00 2 भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) सकाळी 7 .00 ते दु. 11 .00 3 दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री ( डेअरी , बेकरी , कन्फेक्शनरी) (घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार स...