अत्यावश्यक सेवांसाठी निर्बंधात सवलत - कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश. https://youtube.com/channel/UC-W6kxbmEia2MyudOod437A
https://youtu.be/ai-RPTrM0h4
अकोला, दि.15 (जिमाका)- जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार दि. 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंधाना मुदतवाढीचे आदेश निर्गमित केले आहे. तथापि, अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना निर्बंधासह मुभा देण्याचे आदेश जारी केले आहे.
हे आदेश शनिवार दि. 15 रोजीचे रात्री 12 वाजेपासुन ते मंगळवार दि. 1 जूनचे सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील.
निर्बंधासह मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे-
अ.क्र. | बाब | निश्चित करण्यात आलेली वेळ |
1 | सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्वस्त धान्य दुकाने | सकाळी 7.00 ते दु. 11.00 |
2 | भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) | सकाळी 7.00 ते दु. 11.00 |
3 | दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री ( डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी) (घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील) (स्विटमार्टची दुकाने वगळता) | सकाळी 7.00 ते दु. 11.00 सायंकाळी 5.00 ते सांय. 7.00 |
4 | सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री फार्म, मासे आणि अंडी सह) | सकाळी 7.00 ते दु. 11.00 |
5 | कृषी सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. | सकाळी 7.00 ते दु. 11.00 ग्रामपंचायत स्तरावर संबधित कृषी सेवक, तालुका स्तरावर तालुकाकृषी अधिकारी यांची राहील.जिल्ह्यात सदर प्रक्रियेचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांची राहील. |
6 | सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅंकींग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. | सकाळी 11.00 ते दु. 1.00 या करिता सुरु राहतील. |
7 | पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने | सकाळी7.00 ते दु. 11.00 |
8 | पावसाळी हंगाम सामग्री संबंधित दुकाने | सकाळी 7.00 ते दु. 11.00 |
9 | पेट्रोलपंप/डीझेल/सीएनजी गॅस पंप | सकाळी 7.00 ते 11.00 त्यानंतर सकाळी 11.00 ते 08.00 या कालावधीत शासकीय/ मालवाहतूक, अॅम्ब्युलंन्स इ. अत्यावश्यक वातहनांकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर घेवून येणा-या शेतक-यांना |
10 | एमआयडीसी व राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल व डिझेल पंप | नियमित वेळेनुसार |
11 | बॅटरी, इन्हर्टर, युपीएस साहीत्याची दुकाने | आवश्यकता भासल्यास रुग्णालये, कोविड हॉस्पीटल, आयसीयु , क्रिटीकल सेंटर इत्यादी अत्यावश्यक ठिकाणी सामुग्री व तदनुषांगीक साहीत्य केवळ उपलब्ध करुन देण्यासाठी उघडता येईल. (इतर कोणत्याही परिस्थितीत संबंधीत दुकानदार , विक्रेते यांना दुकानउघडून मालाची विक्री करता येणार नाही.) |
12 | मद्य विक्री नमूना FL-2 , Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच य प्रकारानेमद्यविक्री करता येईल. | सकाळी 7.00 ते रात्री 8.00 कोणत्याही परिस्थितीत मद्य विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्दतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. ग्राहकास मद्य विक्रीच्या दुकानास भेट देता येणार नाही. |
13 | रेस्टॉरेन्ट , भोजनालय, उपहारगृह | सकाळी 7.00 ते रात्री 8.00 फक्त होम डिलेव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी असेल |
14 | कृषी उत्पन्न बाजार समिती | दि. 22 मे 2021 पर्यंत बंद राहतील. |
15 | सर्व वकिलांची कार्यालये / चार्टड अकाऊंट यांची कार्यालये | सकाळी 9.00 ते रात्री 8.00 |
16 | ऑप्टीकल्सची दुकाने | सकाळी 9.00 ते रात्री 8.00 आपत कालीन परिस्थीतीतमध्ये रूग्णास डोळ्यांच्या डॉक्टरांनी त्यांचे दवाखान्यास/हॉस्पीटलयास जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील. |
17 | सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल. | नियमित वेळेनुसार |
18 | शिवभोजन | वेळेनुसार |
19 | सराफा व्यवसायीकांना दुकान उघडून तपासणी करण्याकरिता. | गुरुवार सकाळी 10.00 ते 12.00 |
20 | अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील सिएससी सेंटर (CSC Centers) | सकाळी 9.00 ते 1.00 |
वरील बाबी दर्शविण्यात आलेल्या कालावधी नंतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील.
1) सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्याजागा, उद्याने बगिचे पुर्णता बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळ व संध्याकाळ शतपावली (Mornig व Evening Walk) करण्यास बंदी राहील. या बाबत महानगर पालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबंधीतांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करावी.
2) सर्व केशकर्तनालय, सलुन, स्पा, ब्युटीपार्लर संपुर्णता बंद राहतील.
3) शाळा महावद्यिालय, शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णता बंद राहतील. तथापी ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंद राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमीक) जिल्हा परिषद अकोला यांची राहील.
4) सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालय हॉल हे पुर्णता बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, बॅन्ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. व सदरचा लग्न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशिररित्या होणार नाही याची संबंधीत ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती यांनी दक्षता घ्यावी. असे निर्देशनात आल्यास नियमानुसार त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही केली जाईल. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधीत तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील.
5) सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सा सेवा, त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरू राहतील.
6) मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसचे ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरू राहतील.
7) सर्व पेट्रोलपंपावर आदेशान्वये नमूद करण्यात आलेल्या परवानगी दिलेल्या बाबीकरिताच पेट्रोल वितरीत करण्यात यावे. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहणे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यांचे करिता पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅस याची उपलब्धता करुन देण्याबाबतची जबाबदारी कंपनीची अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग यांनी दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा.
8) गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्यात यावे. परंतू ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंद राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधित एजन्सी कार्यवाहीस पात्र राहील. पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
9) कार्यालये- कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं., विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युत पुरवठा, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, धरण व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कृषी विभाग, पशुसंवंर्धन, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच अत्यावश्यक कामकाजाकरिता व कोविडचे अनुषंगाने कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे विभाग व कार्यालये ही सुरु राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व आस्थापणा सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालय यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरू ठेवायचे असल्यास ते केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवता येईल. सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवावी. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधित शासकीय, निमशासकीय कार्यालय सुरू राहतील. उदा. महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्राम पंचायत, आरोग्य सेवा, महानगर पालिका, नगर पालिका व नगर पंचायत ईत्यादी.
10) सर्व आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रे नागरीकाकरीता बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि नागरीकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधा करीता अर्ज सादर करता येतील.
11) उक्त कालावधित नागरीकांसाठी दस्त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील. परंतू अंतर्गत कार्यालयीन कामकाज सुरु राहील.
12) एमआयडीसी (MIDC), उद्योग, कारकाखाने, सुतगिरणी येथे केवळ In-situ पध्दतीने कामकाज सुरू राहील. व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर नियंत्रणाची जबाबदारी राहील.
13) शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक काम चालु राहतील. संबधित शासकीय यंत्रणांना या करीता वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. या करिता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधू नये.
14) सर्व शासकीय कार्यालये अभ्यागंतासाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदने व अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येईल.
15) ई-कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरू राहतील. तसेच स्थानिक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरवणारे कामगार यांचेकडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व संबधित दुकानदारा मार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. संबधित कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. अहवालाची वैधता सात दिवसाकरीता असेल.
16) दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्यादी सेवा सुरळीतपणे रहावी या करिता सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना कामे करता येईल. संबंधीत आस्थापना यांनी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
17) धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्याचे दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.
18) वृत्तपत्र वितरण संदर्भाने वाहतूक अनुज्ञेय राहील. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
19) सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने, यांची वाहतुक नागरीकांना अत्यावश्यक कामाकरिता फक्त अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रूग्णाकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील.
20) जिल्ह्याच्या सर्व सिमा या आदेशाव्दारे सिल करण्यात येत असुन मालमाहतुक व रूग्णवाहतुक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास केवळ अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात येईल. या करीता वेगळ्या स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांचेकडून रितसर परवानगी प्राप्त करुन घ्यावी.
21) जिल्ह्याच्या मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापी मालवाहतूक शाखा, खतसाठा इत्यादी बाबतीत फक्त लोडींग व अनलोडींग करण्यास परवानगी अनुज्ञेय राहील. इतर कारणांकरिता वआवश्यक वैद्यकिय कारणांकरिता जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढून वाहतूक करता येईल.
22) पावसाळयापूर्वी राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण होण्याचे दृष्टीने केवळ In-situ पध्दतीने सुरू राहील.
23) पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबंधीत कामे सुरु राहतील.
24) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टिव्हीन्यूज चॅनल सुरु राहतील.
25) उक्त निर्देशाचे काटेकारपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला , महसूल विभाग तसेच ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीउपविभागीय अधिकारी तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.
26)वरील प्रमाणे आदेश सर्व आस्थापणांना काटेकारपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस कामकाज सुरू ठेवण्याकरीता विशेष परवानगी दि. 15 मे पर्यंत देण्यात येणार नाही. सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरिता त्रिसुत्री पध्दतीची अंमलबजावणी करावी.
27) जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नमूद केल्यानुसार ग्रामिण भागात १० पेक्षा जास्त कोविड रुग्ण असणाऱ्या गांवामध्ये कोविड विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये या करिता कडक निर्बंध लावणे बाबत नमूद केल्यानुसार खालील तालुक्यातील गांवे ही प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषीत करण्यात येत असून सदर गांवाच्या सिमा ह्या बंद करण्यात येत आहेत. सदर गांवामध्ये कडक निर्बध लावण्यात येत असून या गावातील सर्व व्यवहार बंद राहतील. या बाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
अकोला
सांगवी | म्हैसपूर | डोंगरगांव | उगवा | सुकोडा | वणि रंभापुर | बोरगांव मंजू |
बोरगांव खु. | सोनाळा | हिंगणी बु. | रोहणा | सांगळूद बु. | कोठारी | येळवण |
अकोट
सुकळी | लोहारी | अटकळी | अकोलखेड | रुईखेड | बोर्डी | चोहट्टा |
अकोली जहा | दिवठाणा | नांदखेड | -- | -- | -- | -- |
बाळापूर
मनारखेड | मोरगांव सा. | पळशी खु. | हिंगणा | व्याळा | वाडेगांव | पारस |
मानकी | -- | -- | -- | -- | -- | -- |
बार्शिटाकळी
कातखेड | भेंडी महाल | खापाली | टेंभी | महान | खेर्डा खु. | -- |
मुर्तिजापुर
सिरसो | मदापुरी | राजूरा सरोदे | दहातोंडा | -- | -- | -- |
पातूर
असोला | सुकळी | अंबाशी | सस्ती | विवरा | चोंढी | सायवणी |
तेल्हारा
निंभोरा | बेलखेड | सौंदळा | हिवरखेड | वडगांव रोठे | -- | -- |
हे आदेश दि. 15 मे चे रात्री 12.00 वाजेपासून ते दि. 1 जूनचे सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागु राहील या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा