प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ मदत जाहीर करावी या मागणीचे निवेदन मा. उप जिल्हाधकारी साहेब यांना आज सादर......
प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ मदत जाहीर करावी या मागणीचे निवेदन मा. उप जिल्हाधकारी साहेब यांना आज सादर...... ...आज दिनांक 28/7/2021 रोजी मा. उप जिल्हाधिकारी साहेब यांना प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागात 21/07/2021 रोजी आलेल्या महाभयंकर पुरामुळे या परिसरातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, प्रशासनाच्या वतीने या भागाचा सर्वे हा थातुर मातुर करण्यात आला, मोजक्याच घरांचे पंचनामे करण्यात आले आहे, इतर घरांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत, इतर घरांचे पंचनामे लवकरात लवकर करावे व त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व याच प्रभागातील बराचश्या नागरिकांना घरकुलांचा सुद्धा लाभ मिळालेला नाही या बाबीचेही निवेदन आजच्या पाच सहा महिने अगोदर मा.आयुक्त साहेब अकोला यांना देण्यात आले होते, या संपूर्ण बाबीचा विचार करून तात्काळ मदत व कारवाई करावी या मागणीचे निवेदन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा कोषाध्यक्ष धनराज बागडे यांनी माननीय उप जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केले, यावेळी युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा महासचिव आकाश जंजाळ, मनोज बागडे, गजानन बागडे सिद्धांत बागडे , अजय सावळे, शेख फारुख, अक्षय सावळे, शेख शाहरुख, रितिक सावळे, प्रशिक जावळे, प्रदुम उमाळे, यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा