यावल येथील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या; पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

 रिपोटर- अमीर पटेल 
 समर्थ नगरात राहणारे शिक्षक विशाल बाबुराव गवळी (वय-३६) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल पोलीसांनी  दिलेल्या माहितीनुसार, विशाल बाबुराव गवळी (वय-३६) रा. दहीवद ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. स्वामी समर्थ नगर यावल, हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दरम्यान काल मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करायचे कारण नेमके कळू शकले नाही. हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता. त्यांचा मृतदेह उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलिसांत लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे. त्यांनी पत्नी प्रसुतीसाठी १ महिन्यापुर्वी प्रसुतीसाठी गेल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि १ महिन्याची मुलगी, सात वर्षाचा मुलगा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?