दगडी मनवेल गावात कायदेविषयक मार्गदशन शिबिर संपन्न.
आज दिनांक 17/ 9 /20 21 रोजी वार शुक्रवार सकाळी 10 वाजेला यावल तालुका विधी समितीच्या वतीने दगडी मनवेल गावात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात गावातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एम एच बनचरे यांच्या आदेशानुसार यावल वकील बारअसोसिएशनचे सदस्य तथा विधी सेवा समिती सदस्य ऍड गौरव पाटील व यावल वकील बार संघाचे सदस्य तथा भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील , वकील बार संघाचे सदस्य ,ऍड राजेश बारी , ऍड सागर गजरे यावल विधी समिती सदस्य वरूडकर सर या सर्वांनी कार्यक्रमात मार्गदशन केले या प्रसंगी मानवेल गावचे सरपंच सोनवणे माजी सरपंच जिभु पाटील मानवेल ग्रा प सचिव , ग्रा प सदस्य पोलीस पाटील आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड गौरव पाटील यांनी कायदेविषयक जनजागृती व विधी समिती चे ध्येय उद्दिष्ट व वाहन विषयक कायदा ची संपूर्ण माहिती दिली यानंतर वकील संघाचे सदस्य ऍड राजेश बारी यांनी ग्राहक संरक्षण कायदा विषयी संपूर्ण माहिती गावातील नागरिकांना दिली या कार्यक्रमात मानव अधिकार असे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऍड .देवकांत पाटील पाटील यांनी जन्म नोंद मृत्यू नोंद विवाह दाखले दाखले वारस दाखला नोंदी का व कशा काराव्यात यांची माहिती सांगत ग्रामपंचायत अधिनियम , लोक अदालत , माहिती अधिकार ,नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य कौटुंबिक हिंसाचार , या विविध विषयांची कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गावातील नागरिकांनी देखील या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद देत आपल्या मनातील शंका विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले मनवेल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सन्माननीय वकील बांधवांचा सत्कार करण्यात आला तसेच गावात मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रथम वर्ग माननीय न्यायाधीश एम एस बनचरे साहेब यांचे व यावल बार संघ असोसिएशन व विधी सेवा समिती यावल यांचे देखील आभार मानण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा