नायगाव येथे एका अविवाहीत तरुणाची घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद
जिल्हा रिपोटर- अमीर पटेल
तालुक्यातील नायगाव येथे एका अविवाहीत तरुणाची आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली असुन यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक १५ सप्टेंषर बुधवार रोजी नायगाव तालुका यावल येथील राहणारे मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी वय२८ वर्ष , ट्रॅक्टर चालक यांने सकाळी ८ वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली असल्याची दुदैवी घटना घडली असुन , मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. यावल पोलीस स्टेशनमध्ये यांनी याबाबत चंद्रकांत सुखदेव कोळी यांनी खबर अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा