महेलखेडी शाळा व्यवस्थापन समितिच्या अध्यक्ष व उपाध्यक्षकांना पाठिशी घालणाऱ्याशी चौकशी करा
https://youtube.com/c/PATEL82NEWS
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय शिक्षण समितीत मुख्याध्यापक हे गेल्या चार वर्षापासून सयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कारभार पाहत आहे . हम करे सो कायद्या प्रमाणे वागणाऱ्या प्रमाणे त्यांना पाठिशी घालणाऱ्याशी चौकशी करून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावल गटविकास अधिकारी यांच्याकडे आज गुरुवार 23 सप्टेंबर रोजी निवेदनव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
यावल तालुक्यातील महलखेडी जिल्हा परिषद मुलांची शाळेची शोलेय शिक्षण समिती गेल्या 4 वर्षापासून स्थापन झाली आहे . ती नियमाप्रमाणे अद्याप बदल करण्यात आली नसल्याने मालकवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे . शाळेतील मुख्याध्यापक व तथा कथित स्वयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष या त्रिमूर्तीच्चा हम करे सो कायद्याच्या कारभारास पालक वर्गातून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे . नियमानुसार शालेय समितीचा कालावधी फक्त दोनच वर्षाचा असतो , पण या समितीला 4 वर्षं झाले असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष हे पदभार सोडण्यास तयार नाहीत . अशा बेजबाबदारपणे वागणरे शालेय समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष तथा त्यांना पाठिशी घालणाऱ्या या अभीभावात वागणाऱ्या शाळेच्चा मुख्याध्यापकांची तात्काळ चौकशी करून या सर्वांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे .
या निवेदनावर हरी महाजन , ज्ञानेश्वर हिवरकर ,रविद्र न्हाळकर ,सर्फराज तडवी , विश्वनाथ तायडे ,जितेद्र पाटील , निसार तडवी ,भिकन पटेल , संतोष न्हाळकर ,
कुरबान तडवी, शशीकांत अडकमोल यांच्यासह ग्रामस्थ पालकांची स्वक्षरी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा