धाड़सी सुनील मराठे यांचा CMS तर्फे सम्मान पात्रने सत्कार
यावल ( प्रतिनिधि) अमीर पटेल
साहस असे मावळ्यांची ओळख वृद्ध महीलेसह बालकाचे प्राणवाचविजाऱ्या धाडसी सुनील मराठे यांचा CMS तर्फे सन्मानपत्राने सत्कार
जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ढगफुटी मध्ये अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेलीत, यात अनेक लोकांचे जीव संकटात देखील आलेत, यात अनेक मावळ्यांनी स्वतःचे जीव संकटात टाकून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यातीलच एक म्हणजे आपले मराठा बांधव सुनील मराठे यांनी मोठे धाडस दाखवत नदीच्या भर प्रवाहात एका ट्रक च्या टपावर अडकलेल्या एक ७ वर्षाच्या मुलाला ट्रकपर्यंत पोहत जाऊन सुखरूप बाहेर काढले.
याच प्रकारे त्यांनी नदीकाठच्या झोपडी पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्यात अडकलेल्या एका ७२ वर्षाच्या आजींना देखील पुराच्या पाण्यात पोहत जाऊन बाहेर काढले. याचप्रकारे त्यांनी या पूर परिस्थितीत अनेकांची वित्त/जीवित हानी टाळण्यासाठी कार्य केले.
यासाठी CMS - छत्रपती मराठा साम्राज्य गृप तर्फे त्यांच्या या साहस आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याला एक मानाचा मुजरा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी जितेंद्र पवार, शिवाजी पाटील, उदयराम पाटील, सचिन पाटील, गौरव चव्हाणसह इतर CMS सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा