तहसीलदार महेश पवार यांना प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की

patel 82 news



PATEL 82 NEWS: यावल ( प्रतिनिधी )अमीर पटेल 

तालुक्यातील तहसील कार्यालयात प्रलंबीत असलेली संजय गांधी निराधार योजने व विविध योजनेचा लाभ मिळावा या करीता टाकण्यात आलेली प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासुन पडुन असुन ती तात्काळ मंजुर करून निकाली लावण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या एका लिखित निवेदनाव्दारे करण्यात आली आहे . या संदर्भात यावल तहसील कार्यालयात आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार महेश पवार यांना प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , तहसील कार्यालयात मागिल खुप दिवसांपासुन संजय गांधी निराधार , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदीरा गांधी योजना , राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे ही प्रलंबीत असुन ही सर्व प्रकरण पंधरा दिवसाच्या आत मंजुर करून निकाली करण्यात यावी , मागील दिड वर्षापासुन राज्यात कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातले असुन , सर्वसामान्य माणुस हा आर्थीक संकटात आला असुन, या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन तहसील कार्यालयात विविध योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अनेकांनी आपले अर्ज दिले असुन त्या निराधार , विधवा , अपंग या लोकांना वारंवार कार्यालयात येवुन हेलपाटे खावे लागत असुन कार्यालयीन कामकाजात दिरंगाई होत असल्याने पात्र लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असुन , आपल्या कार्यालयातीत ही प्रलंबीत प्रकरणे  तात्काळ निकाली लावण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या यावल शहर शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर तुकाराम रघुनाथ बारी , राहुल कचरे , नितिन बारी , आसीम खान , जयेश चोपडे, दिलीप वाणी , राजु शेख ,सागर चौधरी , मनोज करणकर, आयुष वाणी, गणेश कोलते , सोनु कोळी , सचिन चौधरी , नरेन्द्र माळी , राहुल पवार यांच्या स्वाक्षरी आहेत .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड