ATM मधून पैसे उडविणाऱ्या बिहारच्या टोळीला अटक; बिहारमध्ये जाऊन यवतमाळ पोलिसांची कारवाई

न्यूज़ देखने के लिए लिंक पर क्लिक करे

एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडविणार्‍या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. सायबर सेलच्या पथकाने बिहार राज्यात जाऊन ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बिहारमधील गया जिल्ह्यामधील सुकेशकुमार अनिल सिंग, सुधीलकुमार निर्मल पांडे या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय.

सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत थेट बिहार गाठले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करुन यवतमाळला आणण्यात आलंय. दोघांच्या ताब्यातून इंटरनल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, १५ एटीएम व रोख रक्कम असा एकूण एक लाख २८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी रायगावमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारुन गॅस कटरने एटीएम कापून आठ लाख ६९ हजार रुपये रोख चोरुन नेले. यानुसार तक्रार दाखल करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. १०० किलोमीटर परिसरामधील दुकाने, बाजारपेठांमधील सीसीटीव्ही तपासण्यात आल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मारुती कंपनीची अर्टीगा गाडी संक्षयास्पदरित्या यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी फिरताना दिसून आली. त्याचबरोबर कळंबमधून ऑक्सिजन सिलेंडर चोरीला गेल्याची तक्रारही दाखल झाल्याने याच गाडीच्या माध्यमातून चोरी झाल्याचा संक्षय बळावला आणि त्या दिशेने चौकशी करत प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याचं पाटील भुजबळ यांनी सांगितलं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?