अकोला वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी सुरू करीत त्यांना गुलाबपुष्प देवून नियमांचे पालन करण्याबाबत विनंती केली जात आहे.

ही न्यूज़ पण पहा लिंक वर क्लिक कराअकोला : अकोला शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभागासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र, वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीच, अशा आवेशात वागणाऱ्या अकोलेकरांनी नियम पाळयचे नाही, असेच ठरविलेले आहे.

अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी सुरू करीत त्यांना गुलाबपुष्प देवून नियमांचे पालन करण्याबाबत विनंती केली जात आहे.

सन उत्सवाचा काळ असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. वाहन चालकांसोबत जिल्ह्यातून सर्वदूरवरून येणारे नागरिक पायी बाजारपेठ व मुख्य रस्त्याने गर्दी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने सन उत्सवच्या अनुशांघाने गजबजलेल्या व गर्दीच्या मुख्य चौकात पायी पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशांवये शहरातील मुख्य चौकामध्ये व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक याचेवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौका चौकात वाहतूक शाखेचे पोलिस पायी गस्त घालत आहेत. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. चालक परवाना, वहानाचे कागदपत्रे तपासले जात आहे.

वाहन चालविण्याचा परवाना, मालकी हक्काचे कागदपत्रे सोबत बालळगणार नाहीत, तसेच मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणारे बुलेट चालक, चालू गाडीवर मोबाईलवर संभाषण करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिस कठोर कारवाई करीत आहेत. महिला सुरक्षाचे अनुशांघाने प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये सुरक्षा सटीकर पोस्टर लावण्यात येत आहेत

सर्व मुख्य चौकात आता पायी पेट्रोलिंग करून महिलांच्या छेडखानी, मंगलसूत्र, पर्स चोरिस, दागीने चोरीस प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी वाहतूक नियंत्रण विभागास नवरात्रीच्या उत्सव अनुषंगाने त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक शाखा यांनी त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. नियम न पाळणाऱ्यांना समज देण्यासोबतच नियमांचे पालन करण्याची विनंती करीत त्यांना गुलाबपुष्पही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दिले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?