किनगाव येथे तहसिलदारांचे पीएम किसान खाते हॅक करीत ३८ जणांच्चा नोंदी केल्या म्हणून एका विरुद्ध आयटी अँक्ट गुन्हा दाखल करण्यात आले

किनगाव येथे तहसिलदारांचे पीएम किसान खाते हॅक करीत ३८ जणांच्चा नोंदी केल्या म्हणून एका विरुद्ध आयटी अँक्ट गुन्हा दाखल करण्यात आले

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

 तालुक्यातील किनगांव येथे एका सेतु सुविधा केंद्र चालकाने यावल तहसीलदारांचे पीएम किसान खाते हँक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात उघड़ झाल्याने जिल्हात खळबळ उडाली आहे .गेल्या काही दिवसा पासून तहसील कार्यालयात पीएम किसान संदर्भात नोंदणी थांबवण्यात आल्या होत्या व तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा या बावत
  जिल्हा अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
   यावल तहसील कार्यालयाचे दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फर्यादी नुसार तीन वर्षापासून तहसिल कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणून कामकाज आहे . व त्या अनुशंगाने ते मागील दोन वर्षापासून पि. एम किसान सम्मान निधि योजनेचे कामकाग पाहत आहे . सदर योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे (रजिस्टेशन )आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे , चुकीचे खाते क्र. असल्यास ते दुरुस्ती करणे , शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाईन पिएम किसानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांचे  आदेशाने करत होते .
मात्र १४ ते ३० सेप्टेंबर या कालावधित तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळावर लॉगीन आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेच उपलब्ध व्हायचे म्हणून ते देखील बंद होते . यादरम्यान दि. १४ ते ३० सेप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पिएम किसान संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शना आले व त्यांनी याबाबत थेट यावलचे तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली तेव्हा तहसिलदारांच्चा लॉगीग आयडीला पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हॉक करून ललित नारायण वाघ रा. किनगाव ता. यावल यांना कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांचे नोंदणी टाकल्याने समोर आले आहे.
आधि पण नोंदणी केल्याचा संशय पैसे घेऊन पि.एम किसानच्या नोंदणी केल्या जात असल्याचा तक्रारी येत होत्या
म्हणून आपण आपल्याचे कर्मचाऱ्यांनवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याचा सुचना केल्या तेव्हा ३८ नोंदणी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केद्रात प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्याचे त्यांनी सांगीतले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकार महसूल प्रशासन बदनाम होते असे हसिलदार महेश पवार यांनी सांगितले आहे .
 व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमेनुसार ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील 
उपनिरिक्षक जितेद्र खैरनार हे करीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?