तांदूळ जप्त प्रकरण चार जणांविरोधात गुन्हा दाखल

 तांदूळ जप्त प्रकरण चार जणांविरोधात गुन्हा दाखल

PATEL 82 NEWS



यावल  प्रतिनिधी अमीर पटेल 

गोंदिया येथे काळाबाजारात शासकीय रेशनिग कापडणे - चोपडा यावल मार्गे ३० टन तांदूळ यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतला होता याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालंकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यावल पोलिसांनी माहिती दिल्यानुसार शासनाच्चा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळकाळ्या बाजारात जास्त दराने विक्रि करणारा ट्रक चोपडा यावल मार्गे गोंदिया जात असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती २३ ऑक्टोबर रोजी पुपारी मिळाली . त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, समशेर खान, हेड कॉस्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, कॉस्टेबल सुशिल घुगे , यांच्यासह अन्य पधक हे यावल -चोपडा रोडवर हॉटेल  केसर बाग जवळ तपासणीसाठी थांबले, दुपारी ३ वाजेच्चा सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक क्र. MH 18 AC 874 येतांना दिसून आला . यावेळी यावल पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यात 5 लाख 88 हजार रुपये किमतीचा रेशनिगचे तांदुळ असल्याचे आढळून आले. यासंदर्भात ट्रक चालकाने उडवा उडवीचे उत्तर दिले त्याची कसुन चौकशी केली असता हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी रा. चोपडा यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी , निलेश राजेद्र जैन , रा. कापडणे ता. जि. धुळे यांच्या गोडावून मधून ३० टन भरून भंडारा येथील गितीका पराबोलीक इंटस्ट्रीज भंडारा येथे जात असल्याचे सांगितले. यासंदर्भात यावल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून यावल ठाण्यात जमा करण्यात आला. तर ट्रक चालक केदार मुरलीधर गुरव (वय ३८) रा. आकाश गार्डन समोर शहादा रोड याला ताब्यात घेतले आहे .

तर यावल पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीज येथील गोडावूनला भेट दिली असता त्या ठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले आतापर्यंत दोन महिन्यात 170 टन तांदूळ काळ्या बाजारात विक्रि केल्याची माहिती समोर आली आहे.

साहाय्यक फौजदार मुजफ्फर खान यांच्या फिर्यादिवरुन पंकज मुरलीधर वाणी , रा. चोपडा , निलेश राजेंद्र जैन , संतोष प्रभाकर पाटील , दोन्ही कापडणे ता. जि. धुळे आणि केदार मुरलीधर गुरव रा. शिरपूर जि. धुळे या चार जणांवर यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढिल तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील हे करीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?