चुंचाळे येथील दोन बेपत्ता भावंडांच्चा अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल
चुंचाळे येथील दोन बेपत्ता भावंडांच्चा अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल तालुक्यातील चुचाळे शिवारातून काल दि. २७ ऑक्टोंबर बुधवार दुपार बेपत्ता झालेले दोन भावंडे रात्री उशीरापर्यंत शोध घेवून देखील न आढळून आल्याने या बाबत यावल पोलीसांत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरातील रविद्र साळवे , उज्वला साळवे हे दाम्य वास्तव्यास आहे त्यांना रितेश आणि हितेश हे ५ आणि ६ वर्षांची मुले आहेत . बुधवारी आपल्या आई वडिलांच्चा सोबत ही दोन्ही मुले शेतात गेले होते सावळे शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले शेतात खेळत असतांना कोणी लक्ष दिले नाही. मात्र दुपारी दोनपासून ती मुले दिसून न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला , चुंचाळे शिवारासह नायगाव , सौखेडासीम आदीसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य घाबरले आहे.
. यासंदर्भात रात्री उशिरापर्यत मुलांचा शोध लागला नव्हता. यामुळे दोन्ही बालकांचे वडील रविद्र मधुकर साळवे (वय३५) रा. चुंचाळे ता. यावल यांनी फिर्याद दिली . यात हितेश रविद्र साळवे (वय ६ ) आणि रितेश रविद्र साळवे (वय ५) या दोन्ही भावंडांना कोणीतरी फुसलावून अन्यथा कोणीही तरी अन्य कारणाने पळवून नेल्याप्रकरणी
भाग ५ गुरनं १८७/२०२१ भादवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
पुढिल तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरिक्षक विजय पाचपोळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा