त्रिपुरा राज्यात हिंदुत्वादी संघटना कडुन होत असलेल्या अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराच्या विरुद्ध यावल येथे मुस्लीम बांधवांचा कडकडीत बंद
मागील आठवडयात मोहम्मद पैगंबर यांचा अवमान कारणाऱ्या त्रिपुरा राज्यातील भाजपासह काही हिंदुत्वादी संघटनावर बांगलादेशात घडलेल्या प्रकाराचे पडसाद उमटले असुन, त्रिपुरा राज्यात अल्पसंख्यांक बांधव आणी धार्मिक स्थळांना लक्ष केले जात असुन दंगली भडकवल्या जात असल्याने या घटनांचा जाहीर निषेध म्हणुन आज शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी यावल शहरातील मुस्लिम बांधवांनी सर्व व्यवसाय व दुकाने पुर्णपणे बंद पाळला .त्रिपुरा राज्यात मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी मुस्लीम बांधव आक्रमक झाल्याचे दिसुन आलीत . त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी यावल शहरात सुदर्शन चौक .नगीना चौक खिर्निपुरा डांगपुरा परिसरात तसेच विविध शहरातील मुस्लीम बांधव राहात असलेल्या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला , या वेळी त्रिपुरा सरकारचा निषेध करण्यासाठी आज यावल मध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये बंद दिसून आला आहेदेशातील त्रिपुरा राज्यात विशिष्ट्र संघटने कडुन अल्पसंख्याका वर केलेल्या क्रुरता व धार्मीक स्थळांना आग लावणाऱ्या दोर्षीवर गुन्हा दाखल करणे तसेच जागातील इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर (स ) यांना अपशब्द बोलणाप्यावर त्वरीत गुन्हा दाखल करणे बाबत . यावल शहरातील इमाम अहमद रज़ा एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटी व शहरातील नागरीक यांनी काल गुरुवारी यावल चे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेधन सादर केले की त्रिपुरा राज्यात आमच्या धार्मीक भावाना दुवावण्यांत आल्या त्याच प्रमाणे एका दहशतवादी संघटनेने इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब यांना शिवीराळ भाषेतुन अपशब्द बोलुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या व त्रिपुरा राज्यात धार्मीक स्थळ मशीदी व पवित्र धर्मग्रंथ कुराण दहशतवादि संघटनांकडुन जाळण्यांत आले आहे त्रिपुरा राज्यतील निष्पाप मुस्लिम नागरीकांना जीवे ठार मारण्यात आले त्यांचा मालमत्तेचे नुकसान करण्यांत येऊन घरांची जाळपोळ करण्यांत आली . तरी सदर निवेदना द्वारे विनंती करण्यात आली त्रीपुरा राज्यातील दहशतवादी संघटनांवर बंदी घालुन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करून फोजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे हि विनंती करण्यात आली तसेच त्रिपुरा राज्यातील अल्पसंख्याक समाजाला त्वरीत सुरक्षा प्रदान करून त्यांना भयमुक्त करावे असे निवेदनात बोलण्यात आलानिवेधन देताना हाजी असलम खान सुब्हान खान . हाजी नसिरुद्दीन शेख . मोहसीन खान गफुर खान . शेख अलताफ अब्दुल समद . हाजी शेख कलीम मो याकुब रियाजोद्दीन मोयोदीन . ईसरार खान हबीब खान अमर अली कच्छी राशीद खान वाजीद खान जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा