पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या पंधरा दिवसीय कार्यक्रमाची यशस्वी सांगता

बीड प्रतिनिधि : मुदस्सिर बागबान (पटेल 82 न्यूज़)




आरोग्य, सुरक्षा, नशामुक्ती, वृक्षारोपण आदींवर मान्यवरांनी केले मार्गदर्शन बीड (प्रतिनिधी) - शहरातील   मल्टीपर्पज मैदानावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या पंधरा दिवसीय कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. यात आरोग्य, सुरक्षा, नशामुक्ती, वृक्षारोपण आदींवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शहरातून मॅराथॉन रनिंग रॅली ही काढण्यात आली.

शहरातील मल्टीपर्पज मैदानावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने 16 ते 30 नोव्हेंबर या पंधरा दिवसात जनसामान्यांसाठी लाभदायक ठरेल असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. यात प्रामुख्याने आरोग्य विषयक कार्यक्रमासह कराटे, योगा, लाठी, लॉन्चर, सुरक्षा बचाव इत्यादींचे प्रात्यक्षिक उपस्थितांना मंचावर करून दाखविण्यात आले.  मानवाला नशा कशाप्रकारे पोकळ करून टाकतो. ज्यामुळे नशेखोर व्यक्तीसह त्याच्याशी संबंधित अन्य जणांनाही त्रास सहन करावा लागतो. याबाबत ही मोठ्या पोटतिडकीने मार्गदर्शन करण्यात आले. झाडे लावणे व झाडे जगवणे किती महत्त्वाची आहेत याची महती पटवून देताना झाडांविषयी  इत्त्यंभूत माहिती विषद करण्यात आली. या कार्यक्रमासाठी  जिल्हाभरातून दररोज शेकडो नागरिक हजेरी लावत होते. 15 दिवस चाललेल्या या कार्यक्रम सोहळ्याचा उपस्थित राहत हजारो नागरिकांनी लाभ व आनंद घेतला. कार्यक्रमात जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. पिंगळे यांनी आरोग्य विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्यासह प्रमुख पाहुणे असलेले मुफ्ती मोईनोद्दीन साहब, इमाम कौन्सिल बीड प्रेसिडेंट मुफ्ती आसिफ साहब आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बीड जिल्हा प्रेसिडेंट मोमीन फेरोज यांनीही विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. या पंधरा दिवसीय कार्यक्रमाच्या सांगता समारंभामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजी निहाल अहेमद यांनी केले तर कामरान खान यांनी आभार व्यक्त केले. अशाप्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ने घेतलेल्या या पंधरा दिवसीय कार्यक्रमाचा समारोप यशस्वीरित्या पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?