यावल आगाराची तीन बसवर दगडफेक सेवा पुन्हा थांबवली

अनिल परब यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हरजर राहण्याचे आवाहण केले असता .
यानुसार आज यावल आगरातील १० ते १५ कर्मचारी कामावर हजर झाले असता . बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केले असता मात्र या बसवर दगड फेक झाल्याने बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे .
यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकत्यांनी बस सेवा सुरु करण्यास  अडकावले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

वृत्त असे की परिवहन मंत्री अनिल परब यांच्चा अवाहानाला प्रतिसाद देत यावल आगाराचे १० ते १५ कर्मचारी कामावार हजर होवून बस सेवा सुरळित करण्याचा प्रयत्न केला .
आगारातील १२ कामगरांनी आगार  प्रमुख शांताराम भालेराव यांना विभाग नियंत्रण यांच्या नोटिसेच्या संदर्भ रूजू होण्याबाबत चे पत्र दिले असता .
शुक्रवार दि . २६ नोव्हेंबर सायकाळी ४ वाजेच्चा सुमारास  यावल आगारातून पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने जळगाव साठी तीन बसेस सोडण्यात आल्या .
यातील जळगाव विदगाव जळगाव बस क्रमांक 
एम एच २० बीएल ३४७१ यावल पासून चार किलोमीटर लांब वढोदे  गावाजवळ  सायंकाळी ५:३० वाजेच्चा सुमारास बस पोहचली असता काही अज्ञातांनी मोटर सायकलवर येवून बसवर दगड फेक करत कांचा फोडल्या 
यावल शहरात एकच खडबड उडाली असून .आगार प्रमुख भालेराव यांनी सदर माहिती यावल पोलीसांना कळवली या नंतर यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली .
तसेच रावेरचे पोलीस निरिक्षक तथा यावल प्रभारी कैलाश नागरे व यावलचे पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार , विनोद खांडबहाले , व पथका सोबत बसेचा पंचनामा करून बस यावल आगारात रवाना करण्यात आली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचा काम सुरु आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?