अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर फैजपूर पोलिसांच्या ताब्यात.सर्कल,तलाठी यांची संयुक्त कारवाई.
पाडळसे बामणोद रस्त्यावर फैजपूरकडे जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सर्कल,तलाठी यांनी पकडून फैजपूर पोलीस स्टेशनला जमा केले.पुढील दंडात्मक कारवाई साठी यावल तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.
दि.16रोजी सकाळी पाडळसे बामणोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्र.एम.एच.09जी.ई5966 हे गस्ती पथकातील यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी,फैजपुर मंडळ अधिकारी देवरे,अंजाळे येथील तलाठी सूर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,पाडळसे येथील भूषण सूर्यवंशी, कोरपावली,टाकरखेडा येथील तलाठी तायडे,परसाडे येथील समीर तडवी,यांच्यासह डोंगर कठोरा,चूंचाळे तलाठी,शासकीय वाहन चालक साळवे या पथकाने पकडून फैजपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डंपर चालक संजय कडू पाटील आणि मालक ज्ञानेश्वर लोणारी राहणार आंदलवाडी तालुका रावेर येथील आहेत पुढील दंडात्मक कारवाई साठी गस्ती पथकाने यावल तहसीलदार यांच्याकडे पंचनामा सादर केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा