*चाळीसगावात अकरा किलो गांजा आणि सव्वादोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा प्रतिनिधि अमीर पटेल


 चाळीसगाव शहरातील घाट रोड वरील शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे कोळीवाडा भागातील एका घरात गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना गोपनीयरित्या मिळाल्यानंतर आज दुपारी पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह पोलिस पथकाने सदर घरावर अचानक छापा टाकला. आणि या छाप्यात पोलिसांना गांजा सह रोख रक्कम तसेच इतर साहित्य असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हाती लागला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

घाटरोड रोडवरील कोळीवाडा भागातील रहिवासी असलेला अजय भिकन चौधरी हा रहात असलेल्या घरात गांजा विकला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के के पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पोलिस पथकाने आज दुपारी छापा टाकला असता या छाप्यात त्यांना 11 किलो 214 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा गांजा त्याची किंमत एक लाख 66 हजार रुपये तसेच एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये 58 हजार रुपयांच्या नोटा एक इलेक्ट्रिक वजन काटा तसेच अन्य गांजा विक्रीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. या प्रकरणी अजय भिकन चौधरी यांच्यासह एका महिलेच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस एक्ट 1885 चे कलम 8 (क) 20 (ब) 2 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड