ॲड. हेमंत सपाटे यांना राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार जाहीर
ॲड. हेमंत सपाटे यांना राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार जाहीर
जिल्हा न्यायालय, अकोला येथील प्रसिद्ध वकील, अकोट तालुक्यातील श्री वीरभद्र तिर्थक्षेत्र, कासोद या शासनमान्य "क" वर्ग तिर्थक्षेत्राचे अध्यक्ष ॲड. हेमंत सपाटे यांना तरुणाई फाऊंडेशन चा राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.
जिल्हा मराठी साहित्य संमेलनात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, क्रिडा अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करुन अश्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
२०२१ या वर्षाचा सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार ॲड. सपाटे यांना जाहीर झाला असुन रविवार १२ डिसेंबर रोजी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय सहभाग असल्यामुळे यापूर्वी सुध्दा त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा