राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कु. कांचन रामदास सुरांसे हिने सुवर्ण पदक मिळवले
नुकत्याच सांगली येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्यातील सेंटअन्स इंग्लिश मिडीयम स्कूल गिता नगर या शाळेची विद्याथीनी कु. कांचन रामदास सुरांसे हिने सुवर्ण पदक मिळवले आहे.या प्रसंगी नाथ समाज अकोला च्या वतीने तीचे निवासस्थानी भेट देऊन तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नाथ समाजाचे डॉ.इंगळे, गोपालकृष्ण पवार, सुधाकर पाठक, रविंद्र सुरंसे, दिलीप चव्हाण, हे ऊपस्तित होते.यापूर्वी सुध्दा कांचन हिने 2019 मध्ये रायगड येथे पार पडलेल्या जुनियर राज्यस्तरिय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक, औरंगाबाद येथे 2020 मध्ये पार पडलेल्या इंटर स्कूल स्पर्धेत रजत पदक, तसेच हरीयाना सोनीपथ येथे 2021 मध्ये पार पडलेल्या जुनियर स्पर्धेत रजत पदक मिळवले असुन तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्वांचे श्रेय ती तीचे आईवडील व शाळेतील शिक्षक तसेच तीचे कोच सतिश चंद्र भट, व गजानन कबीर सर यांना देते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा