यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; यावल पोलीसांनी तीघांना घेतले ताब्यात अमीर पटेल
यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी २६ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले असुन यातील दोन संशयीत अल्पवयीन आहेत या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सांगवी खुर्द ता. यावल गावात १५ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुलांनी पीडीत अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत. तर या प्रकरणी यावल पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असुन यातील दोन संशयीत अल्पवयीन असुन त्यांचे वय १६ वर्ष आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा