नव्या व्हॅरिएंटनं सर्वांच्या जीवाला घोर
Omicron पेक्षाही हा व्हॅरिएंट अधिक वेगानं पसरत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
फ्रांसमधील मेरसिली मध्ये 12 जणांमध्ये हा नवा व्हॅरिएंट आढळला.
नोव्हेंबर महिन्याच्य़ा मध्यावर हे नागरिक कॅमरुनहून परतले होते. ज्यानंतर त्यांची विमानतळावरील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.
सुरुवातीला या 12 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं म्हटलं गेलं होतं.
पुढे जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या 12 जणांमध्ये एका नव्या व्हॅरिएंटचं निरीक्षण केलं गेलं. यामध्ये व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर 46 म्युटेशन झालेले तिथे ओमायक्रॉनमध्ये फक्त 32 म्युटेशन आढळले.
परिणामी हा नवा व्हॅरिएंट ओमायक्रॉनहूनही अधिक वेगानं पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नव्या व्हॅरिएंटचं नाव IHU
फ्रांसमध्ये मिळालेल्या या नव्या व्हॅरिएंटचं नाव IHU असं आहे. फ्रांसमधीलच IHU Mediterrane Infection येथील काही अभ्यासकांनी या व्हॅरिएंटचा शोध लावल्यामुळं त्याला हेच नाव देण्यात आलं.
दरम्यान अद्यापही या व्हॅरिएंटला WHO नं कोणतंही नाव दिलेलं नाही. शिवाय या व्हॅरिएंटची कोणतीही गंभीर लक्षणंही आढळलेली नाहीत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा