कोरपावली येथे सरपंच विलास नारायण अडकमोल आयोजित संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजणांचा एकदिवसीय कॅम्प मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न.*

यावल प्रतिनिधि अमीर पटेल
दि. १६ सविस्तर वृत्त असे की  तालुक्यातील कोरपावली येथे माता रमाई जयंती व ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदी निवडुन आल्याचे वर्षपूर्ती निमित्ताने कोरपावली गावात सरपंच विलास नारायण अडकमोल आयोजित संजय गांधी,  इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजणांचा एकदिवसीय कॅम्प ठेवण्यात आला होता. त्यात अनेक विधवा, निराधार, वृद्ध महिला व पुरुषांचे प्रकरणे हे समिती अध्यक्ष मा. शेखर पाटील यांनी स्वतः तपासणी करून त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या कॅम्प मध्ये होत असलेल्या गरीब आदिवासी लोकांचे कामे बघून त्या लोकांनी संयोजक व त्यांच्या पूर्ण टीम चे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. प्रभाकर आप्पा सोनवणे हे होते. 
कार्यक्रमाला जि प गटनेते मा.प्रभाकर आप्पा सोनवणे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष मा. शेखर पाटील, संजय गांधी समितीचे सदस्य संदीप भैय्या सोनवणे, योगिता देवकांत पाटील, कोरपावली उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशन रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह खलील शाह, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, नारायण अडकमोल, पिरण पटेल, मुनाफ तडवी, सिकंदर तडवी, नागो तायडे, देविदास तायडे, कोरपावली चे तलाठी मुकेश तायडे, ग्रामसेवक प्रविन कोळी, ग्राम पंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी तसेच भरपूर ग्रामस्थांची  उपस्थिती होती. यावेळी सूत्रसंचालन श्री नारायण अडकमोल यांनी केले तर आभार सरपंच विलास अडकमोल यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?