*खडके बु! येथे कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळुन शेतकर्याची आत्महत्या..!*
एरंडोल: प्रतिनिधी /नितीन ठक्कर
एरंडोल तालुक्यातील खडके बु! येथील हिम्मत फकीरा पाटील (वय५४वर्षे) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळुन राहत्या घराच्या छतास असलेल्या लाकडी दांड्याला दोरीने गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवल्याची घटना सोमवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत भरत संतोष पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
हिम्मत फकीरा पाटील यांच्याकडे ४बिघे शेतजमीन असुन लागवड केलेले कांदा पिक समाधानकारक नसल्याने त्यांनी त्यावर रोटा फिरवला व कपाशिचे उत्पादन देखिल अत्यल्प आले.
त्यांच्याकडे वि.का.स.सोसायटीचे असलेले ५०हजार रूपयांचे कर्ज कसे फेडावे..? ही विवंचना त्यांना ञस्त करीत होती.
आधीच तुटपुंजी शेतजमीन त्यात नैसर्गिक संकटाचे सावट या कारणास्तव कुटुंबाच्या प्रपंचाचा गाडा कसा पुढे हाकावा..? व कर्जाची परतफेड कशी करावी..? अश्या दुहेरी संकटातुन बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळे या शेतकर्याने मृत्यूला आलिंगन दिले.
त्यांच्या पश्चात पत्नी,१मुलगा,२मुली,जावई,सुन व नातवंडे असा परीवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा