एरंडोल शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी,शिंदे दांपत्य व शिवछत्रपती मित्र परिवारातर्फे गड किल्ले पोस्टर्स माहिती प्रदर्शन आकर्षण ‌.....

एरंडोलप्रतिनिधी :  (नितीन ठक्कर )
- शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे राजे संभाजी पाटील  समाज मंडळ ,मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड ,मराठा महासंघ, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड यांच्यामार्फत शिवजयंती उत्साहात आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी तालुका तहसीलदार सुचिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी ,अमित पाटील, प्रा.मनोज पाटील, देविदास  महाजन, आनंदा चौधरी, डॉक्टर सुरेश पाटील, अभिजित पाटील ,विजय महाजन, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव ,जगदीश पाटील ,राकेश पाटील ,शालिक गायकवाड, रवींद्र निंबाळकर, रवींद्र पाटील कुणाल महाजन ,शेखर पाटील, आर एस पाटीलउपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचे समायोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमात आयोजकांतर्फे "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
             शहरातील बचपन इंग्रजी शाळेतर्फे शिवसृष्टी सजीव देखावा सह सवाद्य मिरवणूक धरणगाव चौफुली, बुधवार दरवाजा, मेन रोड यामार्गावर काढण्यात आली होती . सदर मिरवणुकीत संस्था अध्यक्ष प्रमोद पाटील व प्राचार्य सुरेखा पाटील यांनी  शिवरायांचा इतिहासा विषयी माहिती दिली. यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.
           धरणगाव चौफुली एरंडोल येथे माजी नगरसेविका वर्षा शिंदे  राजेंद्र शिंदे व शिवछत्रपती मित्र परिवार यांच्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी शिवरायांना माल्यार्पण केले.या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे पोस्टर चित्र व माहिती प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला.
        ओम नगर परिसरात ओम नगर मित्र मंडळ व गजानन पाटील, स्वप्नील पाटील यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला.
          शहरातील डी डीएसपी महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा केली यावेळी प्राचार्य एन ए पाटील, समन्वयक डॉ. अरविंद बडगुजर, उपप्राचार्य आर एस पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?