शिरसाड येथे यावल न्यायालयाच्चा वतीने विधि सेवा समिती कडून कायदेविषयीक मार्गदर्शन शिबिर सपन्नप्रतिनिधी । यावल अमीर पटेल
वाढती बाल लैंगिक गुन्हेगारी हा समाजा करीता चिंतेचा विषय आहे.तालुक्यात बालकांवर अनेक ठिकाणी लैगीक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत असे प्रतिपादन यावल न्यायालयाचे सह दिवानी न्यायधिश व्ही. एस. डामरे यांनी केले ते तालुक्यातील शिरसाड गावात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.
शिरसाड ता. यावल येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी सकाळी ९.३० वाजता तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले या शिबीराचे उद्घाटन दिपप्रज्वलन यावल न्यायालयाचे सह दिवानी न्यायधिश व्ही.एस.डामरे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास ॲड. ए. एम. कुलकर्णी, यांनी बाल लैगीक अत्याचार पोस्को कायदयासंबंधी माहिती दिली, त्यानंतर अॅड. डी.आर. बावीस्कर यांनी बाल लैंगिक अत्याचार हे समाजाला लागलेले किड असुन त्याचे समुळ उच्च्याटन व्हावे असे आवाहन केले. बाल लैंगिक अत्याचार कायद्यात काय शिक्षेची तरतूद आहे याचेही त्यांनी माहिती दिली. अॅड ए आर सुरळकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा व निगोशिएबल इंस्टु मेंट अॅक्ट संबंधी माहिती दिली. तसेच महिलांचे अधिकार त्यांनी समजावून सांगितले. तसेच सहदिवानी न्यायधिश व्ही.एस. डामरे यांनी मार्गदर्शन करतांना वाढती बाल लैंगिक गुन्हेगारी या संबंधी चिंता व्यक्त केली व पोस्को कायदया संबंधी विस्तृत माहिती दिली. तसेच उपस्थितांना बाल लैंगिक गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. ए.आर.सुरळकर यांनी केले. कार्यक्रमास शिरसाड गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी उपस्थित होते. शाळेच्या वतीने आभार दिपक चव्हाण यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा