यावल येथील माथाडी कामगारांनी दिले जिल्हा माथाडी कामगार कार्यालयाकडे निवेदन


यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल :जळगाव येथील माथाडी कामगार कार्यालयात यावल येथील माथाडी कामगारांकडून निवेदन देत. जिल्ह्यावरून शहरीभागात मक्तेदाराकडून पोहचवल्या जाणाऱ्या रेशनधान्य उचल वाहतुकीचे हमालीचे काम स्थानिक माथाडी कामगारांकडूनचं केले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील शासकिय गोदामा वरिल माथाडी कामगारांनी जळगाव येथे माथाडी कामगार कार्यालयात निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की जिल्हयात शहरी भागातील विविध रेशन दुकानांवर थेट जिल्ह्यावरून रेशन मालाची वाहतूक (डिलीव्हरी) सुरु करण्यात आली आहे तर या पुर्वी या वाहतुकी करीता स्थानिक तहसिल कार्यालयाच्या गोदामावरून माथाडी स्वरुपाची कामे करण्यासाठी माथाडी मंडळाने नेमणूक केलेल्या विविध टोळयातील नोंदणीकृत माथाडी कामगारांकडून हमालीची कामे केली जायची मात्र, थेट वाहतुकीत ही कामे आता या कामगारांकडून केली जात नाहीये. तर महाराष्ट्र शासनाच्या जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार वाहतूक ठेका माथाडी कामगारांच्या मजूरी लेव्हीसह मंजूर झालेला असून महानगरपालिका,नगरपालिका व नगरपरिषदा कायक्षेत्रातील रास्तभाव दुकानांवर हमाली ची कामे याचं कामगारांकडून करण्यात यावे असे आदेश आहे मात्र, सद्या या आदेशाचे पालन होत नाहीये म्हणुन संबधीत मक्तेदारांना थेट वाहतूकीच्या दरम्यानची दुकान वरील वाराईची व उतराईची कामे माथाडी कामगारांकडून करण्याच्या सुचना कराव्या अशी मागणी केली आहे सदरील निवेदन सुनिल गजरे, गोपाळ बारी, सदाशिव बारी, नारायण बारी, सुरेश गजरे, दिपक बारी, रविंद्र भालेराव, के. एस. बारी, सोनु बारी, सैफोद्यीन गयाशोद्यीन, गोपीचंद बारी, गोकुळ बारी, वसंत बारी, रविंद्र रावते सह कामगारांनी दिले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?