कासोदा येथे मौलाना आझाद स्मृति दिवस साजरा
एरंडोल प्रतिनिधी - नितिन ठक्कर
कासोदा येथील मौलाना आझाद विचार मंच तर्फे मौलाना आझाद स्मृति दिवस साजरा करण्यात
आला.
मौलाना आझाद यांची प्रतिमेला दैनिक देशदूत चे प्रतिनिधी यु ,टी महाजन सर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. प्रतिक जाधव व यु टी महाजन सर यांनी मौलाना आझाद विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रज्ञा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतिक जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शब्बीर गुप्ता, रजा केबलचे प्रोप्रायटर शेख मुश्ताक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
येथील नामवंत पैलवान मोइन अली मूख्तारअली यांनी जळगाव जिल्ह्यात व राज्यात कुस्त्यांची दंगल मध्ये विजय मिळवला यानिमित्ताने त्यांच्या सत्कार पत्रकार यु ,टी महाजन सर व राजाभाऊ मंत्री पतसंस्था चे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सलाउद्दीन अलाउद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आला
सूत्रसंचालन व प्रास्ताविक मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा संघटक नुरुद्दीन मुल्लाजी यांनी केले
अब्दुल सत्तार जनाब, मनसुर पठाण, निसार हाजी शेख मुसा, मुजफ्फर अली ,अब्दुल कादर, रियाजउद्दिन सखाउद्दीन मुल्लाजी, प्रमोद पत्की(महाराज) मुख्तार पैलवान ,पत्रकार शेख इमरान ,मुख्तार पटवे ,प्रेस फोटोग्राफर किशोर चौधरी ,शेख आरिफ शेख आलम ,नूर भाई, आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार मौलाना आझाद विचार मंचचे शहराध्यक्ष आरिफ पेंटर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा